मुंबई

मुख्यमंत्री काम करत नाही म्हणून सर्वसामान्यांना राज्यपालांकडे जावं लागतं; भाजप नेत्याची टीका

तुषार सोनवणे

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर राजकिय वर्तुळात उधान आले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज ठाकरेंचे नाव न घेता त्यावर टीका केली आहे. तर, त्याला भाजपचे नेते प्रविण दरेकर यांनी उत्तर दिले आहे.

राज्यातील विविध प्रश्न आणि वाढीव वीजबिलांच्या प्रश्नामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोशारी यांची भेट घेतली. राज यांच्या भेटीमुळे राज्यात राजकिय चर्चांना उधान आले आहे. राज यांनी मुख्यमंत्र्यांना न भेटता राज्यपालांना भेटणे म्हणजे मुख्यमंत्र्यासह राज्य सरकारला महत्व न दिल्याचे बोलले जात आहे. आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांचे नाव न घेता टीका केली. राज्यात लोकनिर्वाचित मुख्यमंत्री असताना राज्यपालांकडे प्रश्न घेऊन जाणे म्हणजे महाराष्ट्राचा अपमान असल्याचे त्यांनी म्हटले. अद्याप यावर मनसे नेत्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

संजय राऊत यांच्या टीकेला भाजपने मात्र जोरदार उत्तर दिले आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी म्हटले की, मुख्यमंत्री कामे करीत नाहीत त्यामुळे सर्वांनाचा राज्यपालांकडे जाण्याची वेळ येते. तसेच तुम्ही म्हणजे महाराष्ट्र या भ्रमातून शिवसेने लवकरात लवकर बाहेर आलं पाहिजे या राज्यातील प्रत्येक नागरिक म्हणजे महाराष्ट्र आहे. राज्यातील कोणत्याही प्रश्नाचं नीट उत्तर राज्य सरकारकडून मिळत नाही. म्हणून सर्वांना राज्यपालांना भेटायला जावे लागते. राज ठाकरे देखील याच भावनेने गेले असावेत असेही दरेकरांनी म्हटले आहेत.

मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने नीट कामे केली तर राज्यातील सर्वसामान्य आणि नेत्यांना राजभवनाच्या पायऱ्या चढायची गरज राहणार नाही असा टोलाही दरेकरांनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG ODI: रोहित शर्मा, हार्दिक पांड्या OUT; दोन खेळाडूंचे पदार्पण! वन डे मालिकेसाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

MRP Law Reforms: जंतर-मंतर येथे २५ मे रोजी एमआरपी कायद्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने सत्याग्रह आंदोलन

Cockroach Janata Party : ‘कॉक्रोच जनता पार्टी’ला कोणाचं फंडिंग? राजकीय वाटचाल कशी असणार, अभिजीत दिपकेंनी सगळचं सांगितलं; "मी तर अमेरिकेत"

Jalna Crime: राजेश कोरकणे हत्येप्रकरणी ग्रामस्थांचा संताप: मोक्का लावा, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवा, कठोर कारवाईची मागणी

Latest Marathi News Live Update : नागपूरमध्ये सिग्नलवर ग्रीन नेट आणि पाण्याचा फवारा

SCROLL FOR NEXT