राज्यपाल विरुद्ध राज्य, पुन्हा वाद पेटण्याची शक्यता; आमदार नियुक्तीसाठी कडक नियम?

सुमित बागुल
Saturday, 31 October 2020

राज्यपाल नियुक्त आमदार कोट्यातील १२ आमदारांची यादी सोमवारी राज्यपालांकडे पाठवली जाणार आहे असं समजतंय.

मुंबई : राज्यपाल विरुद्ध सरकार वाद काही नवा राहिलेला नाही. राज्य विरुद्ध राज्य  शीतयुद्ध सुरूच आहे. दरम्यान नुकतीच मंत्रिमंडळ बैठक पार पडली त्यामध्ये राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नावांबाबत बैठकीत प्रस्तव ठेवण्यात आला. त्यावर चर्चा झाल्यानंतर हा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर देखील झाला. आता या १२ नावांची यादी सोमवारी राज्यपालांकडे पाठवली जाणार असल्याची माहिती समजतेय. 

अशात दुसरीकडे राज्यपाल नियुक्त १२ आमदारांवरून राज्यपाल विरद्ध राज्य असा संघर्ष पुन्हा पेटणार अशी चिन्ह आहेत. कारण १२ जागांच्या नियुक्तीसाठी राज्यपाल अतिशय काटेकोर नियम लावणार असल्याचं आता समजतंय. आर्टिकल १७१ (५) नुसार राज्यपाल कोट्यातील नियुक्ती ही कला, साहित्य, विज्ञान, सहकार आणि समाजकार्याच्या क्षेत्रातून असावी असा नियम आहे. जी नावे या निकषांमध्ये बसतील त्यांनाच राज्यपाल मंजुरी देऊ शकतात. ओढून ताणून निकषांमध्ये बसवलेल्या नावांच्या शिफारशींवर राज्यपाल फुली मारू शकतात. त्यामुळे राज्यपाल नियुक्त आमदार निवडीसाठी राज्यपाल अतिशय काटेकोरपणे नियम लावण्याची शक्यता  जातेय. 

महत्त्वाची बातमी : लोकल स्टेशन्सवर गर्दी होऊ नये म्हणून सरकारचा मास्टरप्लॅन, कोलकात्ता मेट्रोच्या धर्तीवर ई-पास व्यवस्थेवर अभ्यास

राज्यपाल नियुक्त आमदार कोट्यातील १२ आमदारांची यादी सोमवारी राज्यपालांकडे पाठवली जाणार आहे असं समजतंय. १२ जागांसाठी शिवसेना,  राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून प्रत्येकी चार नवे निश्चित  करण्यात आली आहेत. तीनही पक्षांकडून या नावांबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. 

governor might follow strict norms to appoint MLAs on vidhan parishad


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: governor might follow strict norms to appoint MLAs on vidhan parishad