Crime news esakal
मुंबई

Crime : हिरे आयात करणाऱ्या कंपनीच्या संचालकाला अटक; कारण...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : चढ्या भावाने हिऱ्यांची आयात करणाऱ्या कंपनीच्या संचालकाला नुकतीच सीमाशुल्क विभागाने अटक केली. आरोपी संचालकाला यापूर्वी गुजरातमधील महसूल गुप्तवार्ता संचलनालयाच्या डीआरआयच्या पथकाने अटक केली होती. त्याप्रकरणी जामिनावर सुटल्यानंतर आरोपी संचालकाने पुन्हा तशाच प्रकारचा गुन्हा केला. सागर शहा असे आरोपी संचालकाचे नाव आहे.

प्रकरण थोडक्यात

रामपुरिया एक्सपोर्ट नावे खासगी कंपनीने 19 कोटी 70 लाख रुपये किंमतीच्या हिऱ्यांची आयात केली होती. संबंधित हिरे चढ्या भावाने आयात करण्यात आल्याची माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली होती. त्यामुळे सीमाशुल्क विभागाने त्रिसदस्यीय तज्ज्ञांच्या समितीकडून हिऱ्यांची तपासणी करून घेतली असता त्यांची किंमत 13 कोटी 29 लाख रुपये असल्याचे निष्पन्न झाले.

बाजारभावापेक्षा 6 कोटी 41 लाख रुपये अधिक किंमत दाखवून हिरे आयात करण्यात आल्याचे उघड झाले. त्यानंतर सीमाशुल्क विभागाने कंपनीच्या मुंबईतील ऑपेरा हाऊस परिसरातील कार्यालयात छापा टाकला. त्यात 1068 कॅरेटचे हिरे व काही कच्च्या स्वरूपातील हिरे ताब्यात घेण्यात आले.

या हिऱ्यांच्या खरेदीबाबत कोणतीही ठोस कागदपत्रे उपलब्ध करण्यात न आल्यामुळे त्यांचे मूल्यांकन करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. या आयातीमागे सागर शाह याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे सीमाशुल्क विभागाने त्याला अटक केली.

प्रमाणपत्राशिवाय आयात

कच्च्या हिऱ्यांच्या निर्यातीसाठी किम्बर्ले प्रक्रिया प्रमाणपत्राची आवश्यकता असते. पण या प्रमाणपत्राशिवायच हिऱ्यांची आयात करण्यात आल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. आरोपी संचालकाने आयात केलेले हिरे त्याच्या मालकीचे नसून केवळ त्याचा आयात-निर्यात कोड वापरण्यात आला आहे. त्या बदल्यात त्याला 0.3 टक्के कमिशन मिळत होते. याप्रकरणी सीमाशुल्क विभागाने सीमाशुल्क कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून शाहला अटक केली. यापूर्वी सुरत सेझ येथून अन्य ठिकाणी बेकायदेशिररित्या हिरे नेल्याच्या आरोपाखाली गुजरात डीआरआयने त्याला अटक केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT