मुंबई

दीपिका पदुकोणच्या मॅनेजरचा अटकपूर्व जामीनासाठी विशेष न्यायालयात अर्ज

- सुनीता महामुणकर

मुंबई: अभिनेत्री दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाशने अटकपूर्व जामीनासाठी शनिवारी विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला. मंगळवारी यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात अंमलीपदार्थ संबंधित तपास एनसीबी करत आहे. यामध्ये आरोपी करमजीतच्या चौकशीत करिश्माचे नाव उघड झाले आहे. पोलिसांनी यापूर्वी तिला चौकशीला बोलावले होते. आता पुन्हा तिला समन्स बजावण्यात आले आहे. मात्र तरीही ती चौकशीला हजर झालेली नाही. आता तिने विशेष न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे. 

करिश्माच्या वर्सोवा येथील घरात 1.7 ग्रॅम चरस आणि सीबीडी आयलच्या तीन बाटल्या पोलिसांना मिळाल्या आहेत असे सांगण्यात येते. यावेळी ती घरामध्ये नव्हती. त्यामुळे तिच्या अडचणीत वाढ झाली आहे. यापूर्वी दीपिका आणि तिच्या चॅटमधून ड्रग्सबाबतीत महत्त्वाचे खुलासे उघड झालेत. एनसीबीने दोघींनाही चौकशीसाठी बोलविले होते.

गेल्या महिन्यात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने घरी छापा टाकला होता.  अटक केलेल्या पॅडलर्सशी केलेल्या चौकशीत आणि तांत्रिक माहितीच्या आधारे एनसीबीला कळले की करिश्मा प्रकाश या ड्रग्ज पॅडलर्सच्या नियमित संपर्कात होती.

----------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Deepika Padukone manager Karishma Prakash filed application special court seeking pre arrest bail

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajya Sabha Politics: राज्यसभा निवडणूक बिनविरोध शक्य, आजोबा - नातू एकाचवेळी राज्यसभेत; एकनाथ शिंदेंनी आपल्याच नेत्यांचा केला गेम

Latest Marathi News Live Update : राज्याचा अर्थसंकल्प आज विधीमंडळात; कोणत्या घोषणा होणार?

Kannad Accident : कन्नड-वैजापूर मार्गावर अपघात; जेहूरचा तरुण जागीच ठार

Whale Vomit Smuggling Case : पाच किलो वजन आणि किंमत कोटींच्या घरात! महाबळेश्वरमध्ये व्हेल माशाच्या उलटीची तस्करी; पुणे, मुंबईसह मालवणचे सात जण ताब्यात

Sakal News Impact : पुण्यातील अल्पसंख्याक शाळांवर टांगती तलवार; शिक्षण उपसंचालकांकडून चौकशीचे आदेश

SCROLL FOR NEXT