esakal | मुंबईत दिवाळी दरम्यान कोरोना संसर्ग वाढण्याची भीती! वैद्यकीय तज्ज्ञांचे मत
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत दिवाळी दरम्यान कोरोना संसर्ग वाढण्याची भीती! वैद्यकीय तज्ज्ञांचे मत

मुंबईत दिवाळी दरम्यान कोविड संसर्ग वाढण्याची भीती असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले असून चाचणी क्षमता दिवसाला 24 हजारापर्यंत नेण्याची तज्ञ समितीच्या सदस्यांची मागणी केली आहे

मुंबईत दिवाळी दरम्यान कोरोना संसर्ग वाढण्याची भीती! वैद्यकीय तज्ज्ञांचे मत

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : मुंबईत दिवाळी दरम्यान कोविड संसर्ग वाढण्याची भीती असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले असून चाचणी क्षमता दिवसाला 24 हजारापर्यंत नेण्याची तज्ञ समितीच्या सदस्यांची मागणी केली आहे. सध्या दिवसाला 12 ते 16 हजार चाचण्या होत असून त्या वाढवण्याची गरज आहे. 

ज्येष्ठ अभिनेत्रीचा दावा दिशाभूल करणारा! वॉटर प्युरिफायरची जाहिरात मागे

दसऱ्यादरम्यान कोविड 19 च्या चाचण्यांमध्ये कमरतता आली होती. त्यामूळे, डॉक्टर्स आणि वैद्यकीय तज्ज्ञांनी पालिकेला चाचण्या वाढवायला सांगितले आहे. किमान दिवसाला 24 हजार चाचण्या करणे गरजेचे आहे. दरम्यान, कमी चाचण्या होऊनही मुंबईत पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद कमी आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेमुळे आणि जे मास्क वापरत अश्यांवर होणार्या कारवाईमुळे ही रुग्णसंख्या कमी होण्याचे प्रमाण वाढते आहे असे मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी सांगितले आहे.

कोविड 19 टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईत सणांदरम्यान चाचण्यांची क्षमता वाढवली पाहिजे. किमान दिवसाला 20 हजार ते 24 हजारांपर्यंत आरटीपिसीआर चाचण्या झाल्या पाहिजेत. शिवाय, अनलॉक झाल्यावर ही चाचण्यांच्या प्रमाणात वाढ होणे गरजेचे असुन त्यामुळे कोविडच्या आलेखाकडे लक्ष देणे सोपे होईल. चाचण्यांसाठी कियोस्क मशीन किंवा ड्राईव्हन चाचण्यांची सुविधा सुरु केली पाहिजे. 

उर्मिला मातोंडकरांच्या उमेदवारीबद्दल वडेट्टीवरांचा मोठा गौप्सस्फोट; जाणून घ्या काय म्हणाले

दरदिवशी किमान 12 ते 16 हजार चाचण्या होतात. मात्र, फक्त दसर्या दिवशी 10 हजाराच्या खाली चाचण्या झाल्या होत्या असेही चहल यांनी सांगितले. माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमात 24.5 लाख कुटूबांपर्यंत पोहोचलो असून जनजागृती केली आहे. शिवाय, दर दिवशी 30 मृत्यू होत असुन चाचण्यांमध्ये सुसंगती आहे. तर, 85 टक्के रुग्ण हे लक्षणे नसलेले आहेत असे ही चहल यांचे म्हणणे आहे. दिवाळीपूर्वी किमान 7 लाख लोकांना मास्क न घातल्याप्रकरणी दंड ठोठावू शकतो. 

चाचण्यांची संख्या- 

23 ऑक्टोबर - 14, 285 

24 ऑक्टोबर - 11, 817 

25 ऑक्टोबर - ( दसरा) - 7,576

26 ऑक्टोबर - 11, 643

27 ऑक्टोबर - 15, 825

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image