dentist 
मुंबई

कोरोनामुळे दंतवैद्यकांपुढे संकटांचा डोंगर; कठोर उपाययोजनांसह खर्चही वाढला....

संजय घारपुरे

मुंबई : दुखरा दात हा खूपच त्रासदायक ठरतो. दात दुखायला लागला की आपली पावले लगेच दंतवैद्यकांकडे वळतात; पण आता कोरोनाच्या महामारीत दंतवैद्यकांकडील रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. दोन महिने बंद असलेले दातांचे दवाखाने सुरु झाले खरे; मात्र लॉ़कडाऊनच्या दोन महिन्यांच्या बंदीतून अनेक जण सावरलेले नाहीत. त्यातील काही जण आपली प्रॅक्टीस सोडण्याचा विचार करीत आहेत.  

कोरोना महामारीमुळे दंतवैद्यकांना सर्व उपकरणांचे सातत्याने निर्जंतुकीकरण तसेच पीपीई किटची सक्ती करण्यात आली आहे. अर्थातच त्यामुळे खर्च वाढला आहे. त्यामुळे दातावरील उपचाराचे दर वाढले आहेत. आम्हाला उपचारासाठी आखून दिलेली मार्गदर्शक तत्त्वे खूपच त्रासदायक आहेत. त्याचबरोबर दाताचे अनेक दवाखाने कमी जागेत असतात. काही तर दीडशे चौरस फूटात असतात. या परिस्थितीत सुरक्षित अंतर कसे राखले जाणार, अशी विचारणा घाटकोपरमध्ये व्यवसाय करीत असलेल्या डॉ. मनीश घुरी आणि डॉ. अवनी घुरी या दाम्पत्याने केली. आता आम्हाला एकंदरीत सर्व उपाय अमलात आणण्यासाठी शुल्क वाढवण्याशिवाय पर्याय नाही. अर्थात कोरोनाच्या धास्तीमुळे अनेक रुग्ण कमी झाले आहेत. 

दाताच्या अत्याधुनिक उपचाराच्यावेळी अनेक गोष्टी परदेशातून आलेल्या असतात. त्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. याकडे डॉ. मुकुंद शानबाग यांनी लक्ष वेधले. डॉ. अमित साळुंके यांनी यांनी क्लिनीकचे भाडेही देणे अवघड झाल्याने काहींनी ती बंद केली आहेत, असे सांगितले. त्याचवेळी त्यांनी नोव्हेंबरपर्यंत परिस्थिती सुधारेल अशी आशा व्यक्त केली. अनेक डॉक्टरांनी शुल्कात 25 टक्के वाढ करणे भाग पडले असल्याचे सांगितले.

दंत विद्यालयातील प्राध्यापक डॉ. हेमंत धुबिया यांनी अनेक दंतवैद्यकांनी प्रॅक्टीस बंद करुन अन्य पर्यायांचा विचार सुरु केल्याचे सांगितले. त्यांनी बंगळूर येथील दंतवैद्यकांची संपूर्ण एक बॅच बीपीओमध्ये गेली आहे, तर काहींनी एमबीए करण्याचे ठरवले आहे, तर काही फार्मा कंपनीतील नोकरीस पसंती दिली आहे. तर काहींनी राज्य सरकारच्या रुग्णालयात तात्पुरती सेवा करण्यास सध्या पसंती दिली आहे.
---
संपादन : ऋषिराज तायडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: उत्सवांवर निर्बंध नाहीत, पण अन्नात भेसळ नकोच! तुकाराम मुंढेंचं FDAच्या आदेशावर स्पष्टीकरण

MPSC Students Protest : पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश ! ओंकारेश्वर मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा,राजकीय नेतेही सहभागी

Marathi News Live Updates : सरकार जाणूनबुजून हलगर्जीपणा करत आहे : मनोज जरांगे पाटील

Vivoचा मोठा धमाका! Vivo Y31t 5G ची किंमत झाली फक्त 24,695; Flipkart वर खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी...

गर्दीत बसमध्ये चढताना धक्का लागून पडली, एसटीच्या चाकाखाली चिरडून १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू; आईच्या डोळ्यादेखत घटना

SCROLL FOR NEXT