आयसीएसई मंडळाचा निकाल जाहीर; गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा निकालात झाली...

तेजस वाघमारे
शुक्रवार, 10 जुलै 2020

कोरोना संकटामुळे बारावीच्या 8 तर दहावीच्या 6 विषयांची परीक्षा रद्द करण्यात आली होती. या विषयांचे मूल्यांकन परीक्षा झालेल्या विषयात मिळालेल्या गुणांच्या आधारे करण्यात आले. या निकाल पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचे समाधान न झाल्यास अशा विद्यार्थ्यांना गुण सुधारण्यासाठी पुन्हा परीक्षा देता येणार आहे. 

मुंबई : आयसीएसई मंडळाने दहावी बारावीचा निकाल जाहीर केला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा निकालात किंचीत वाढ झाली आहे. दहावीचा निकाल 99.34 टक्के तर बारावीचा निकाल 96.84 टक्के लागला आहे. कोरोनामुळे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीही मंडळाने यंदा जाहीर केली नाही. 

विनोदी आणि तितकाच संवेदनशील; शुभा खोटेंनी जागवल्या जगदीप यांच्या आठवणी... 

कॉन्सिल फॉर द स्कूल सर्टीफिकेट एक्झॅमिनेशनने (सीआयसीएसई) शुक्रवारी (ता.10) ऑनलाईन निकाल जाहीर केला. देशभरातून 2 लाख 7 हजार 902 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी 2 लाख 6 हजार 525 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर 1 हजार 377 विद्यार्थी नापास झाले आहेत. बारावीची परीक्षा 85 हजार 611 विद्यार्थ्यांनी दिली होती. यापैकी 2 हजार 798  विद्यार्थी नापास झाले आहेत. तर 82 हजार 813 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

...म्हणून त्या मृतदेहाचे पुन्हा शवविच्छेदन करा; उच्च न्यायालयाचे निर्देश...

कोरोना संकटामुळे बारावीच्या 8 तर दहावीच्या 6 विषयांची परीक्षा रद्द करण्यात आली होती. या विषयांचे मूल्यांकन परीक्षा झालेल्या विषयात मिळालेल्या गुणांच्या आधारे करण्यात आले. या निकाल पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचे समाधान न झाल्यास अशा विद्यार्थ्यांना गुण सुधारण्यासाठी पुन्हा परीक्षा देता येणार आहे. 

रेल्वेकडून नवतंत्रज्ञानाचा वापर; घाट, बोगद्यात उपयोगी पडणार...

घरबसल्या मिळणार निकालपत्र
कोरोनामुळे यंदा 'सीआयसीएसई' च्या विद्यार्थ्यांना घरबसल्या निकालपत्र देण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना डिजी लॉकर अॅप (DigiLocker)डाऊनलोड करावे लागणार आहे. याद्वारे विद्यार्थी निकालपत्र आणि मायग्रेशन सर्टीफिकेट डाऊनलोड करू शकतात. 

कोविड रुग्णालयांंवर तब्बल इतक्या कोटींचा खर्च; वाचा 'एमएमआरडीए' प्रशासनाची माहिती

दहावीचा निकाल वाढला
आयसीएसईमध्ये महाराष्ट्र राज्याचा दहावीचा निकाल 99.92 टक्के तर बारावीचा निकाल 98.53 टक्के इतका लागला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दहावीचा निकाल वाढला आहे. तर राज्याच्या बारावीच्या निकालात घट झाली आहे. गेल्यावर्षीचा दहावी, बारावीचा निकाल अनुक्रमे 99.85 टक्के आणि  99.27 टक्के इतका लागला होता.

अदानी वीज ग्राहकांसाठी गुड न्यूज! आता असं भरता येणार वीज बिल

महाराष्ट्रात आयसीएसईच्या शाळांमध्ये वाढ
आयसीएसई मंडळाच्या शाळांचे जाळे राज्यात वेगाने वाढत आहे. यंदा दहावी, बारावीच्या शाळांमध्ये अनुक्रमे 18 आणि 7 अशी वाढ झाली आहे. गेल्यावर्षी राज्यात दहावीच्या 208 आणि बारावीच्या 44 शाळा होत्या.

---
संपादन ः ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ICSE 10 and 12 result declared, read full story...