मुंबई

एन-95 सह सर्वच मास्कचे दर निश्‍चित करण्याची मागणी आरोग्य विभागाने फेटाळली

भाग्यश्री भुवड


मुंबई : सरकारच्या निर्बंधांचा आम्हाला फटका बसत आहे. दुसरीकडे मोठ्या टेक्‍सटाईल कंपन्या मनाला वाटेल त्या किमतीत मास्क विकत आहेत. त्यामुळे आता सगळ्याच मास्कचे दर निश्‍चित करावेत, अशी मागणी वैद्यकीय वापरासाठी मास्क बनवणाऱ्या कंपन्यांनी आरोग्य विभागाकडे केली आहे; मात्र सरकारच्या आरोग्य विभागाने टेक्‍सटाईल कंपन्यांकडून बनवण्यात येत असलेले मास्क अत्यावश्‍यक गोष्टीत मोडत नसल्याचे कारण देत एन-95 वैद्यकीय मास्क बनवणाऱ्या कंपन्यांची मागणी धुडकावून लावली आहे. 

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, टेक्‍सटाईल कंपन्यांकडून बनवण्यात येणारे मास्क अत्यावश्‍यक गोष्टीत मोडत नाहीत. या आधी एफडीएनेही सरकारला कापडी मास्कचे दर निश्‍चित करण्याबाबत विचारणा केली होती. सध्या कापडी मास्क हे एक स्टाईल स्टेटमेंट झाले असून, अनेक मोठ्या टेक्‍सटाईल कंपन्या मास्कच्या विक्रीत उतरल्या आहेत. कापडी मास्क 10 रुपयांपासून ते अगदी 600 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. दरामधील ही तफावत व्यावसायिकरीत्या योग्य नसल्याचे एन-95 आणि सर्जिकल मास्क निर्मात्यांचे म्हणणे आहे. आरोग्य विभागाचा दावा आहे की, एन-95 मास्क आणि सर्जिकल मास्क हे मुख्यत्वे फ्रंट लाईन वर्कर्ससाठी आहेत, तर एन-95 मास्क हे वैद्यकीय उपकरणाचा दर्जा आहे.

राज्य सरकारने एन-95 मास्क आणि सर्जिकल मास्कचे दर निश्‍चित केले असून, एन-95 मास्कची किंमत 19-45 इतकी निश्‍चित केली आहे. तीन प्लाय मास्क आणि दोन प्लाय मास्कची किंमत प्रत्येकी 4 रुपये आणि 3 रुपये अनुक्रमे निश्‍चित केली आहे. दर निश्‍चिती आधी एन-95 मास्क 150-600 रुपये प्रती तर तीन प्लाय मास्क 20 ते 40 रुपये प्रत्येकी मिळायचा. मास्कचे दर निश्‍चित केल्यानंतर राज्यात एन-95 मास्कचा तुटवडा असून, अनेक कंपन्यांनी इतर राज्यात पुरवठा करण्यात सुरुवात केली आहे. जिथे त्यांना मास्कची अधिक किंमत आकारता येते. दिवाळीनंतर कोव्हिडची प्रकरणे वाढल्यास एन-95 मास्कचा तुटवडा आणखी जाणवू शकतो. 


----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-LPG Rate: अहमदाबादमध्ये पेट्रोल 101 रुपयांवर, महाराष्ट्रात किती? पाहा पेट्रोल-डिझेल अन् LPG सिलेंडरचे ताजे दर

Marathi News Live Updates : मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज १० वा दिवस, पाणी सलाईन घेण्यास नकार

अचानक आवाज झाला अन् इमारत कोसळली, घटनेचा CCTV VIDEO समोर; ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू, अजूनही बचावकार्य सुरू

Miami Airport Plane Crash : ॲमेझॉनचं विमान लँडिंग करताना धावपट्टीवरून घसरलं अ्न रस्त्यावर आलं, वाहनांना धडक; ५ जणांचा मृत्यू

पुन्हा पुन्हा तेच चेहरे पाहून कंटाळली तापसी पन्नू? बॉलीवूडच्या कास्टिंगवर तापसी पन्नूची टीका करत म्हणाली, 'रोमँटिक कॉमेडीत तेच...'

SCROLL FOR NEXT