Dharavi Crime esakal
मुंबई

Dharavi Crime: मुंबई हादरली! प्रियकराकडून प्रेयसीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

रुपेश नामदास

प्रेयसीकडून प्रियकराचा चाकूने वार करून हत्या केल्याची पुण्यातील वाघोली भागातील घटना ताजी असतानाच, मुंबईच्या धारावी परिसरातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धारावीत प्रियकरानेच प्रेयसीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये तरुणी ६०% ते ७०% भाजली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पीडितेवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरूणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न तिच्या लिव्ह-इन पार्टनरने केला आहे. यात तरुणी गंभीर रित्या भाजली अजून तिला तातडीने सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या धक्कादायक घटनेनं संपूर्ण धारावी हादरून गेली आहे.

या प्रकरणी ४१ वर्षीय आरोपी नंदकिशोर पटेल याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. तर या प्रकरणी १६ वर्षीय मुलाला देखील ताब्यात घेतले आहे.

काही दिवसांपूर्वी पुण्यातील वाघोली परिसरात प्रेयसीकडून प्रियकराचा चाकूने वार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता.

प्रियकर आणि प्रेयसी दोघेही मागील काही महिन्यांपासून वाघोली परिसरात एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होते. या दोघांमध्येही प्रेम संबंध होते. मात्र पहाटेच्या सुमारास प्रियकराचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडला होता. या घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलीस घटनास्थळी येवून. प्रियकराला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नालासोपारा ZP शाळेत कुकरचा स्फोट; भडका उडताच गरम खिचडी चिमुकल्यांच्या अंगावर; 2 विद्यार्थ्यांसह महिला जखमी

नारकरांच्या घरी झाली सत्यनारायण पूजा; ऐश्वर्या यांनी स्वतः बनवला प्रसादाचा शिरा, कशी केली तयारी? दाखवला खास व्हिडिओ

Hartalika 2026: हरतालिकेच्या दिवशी ‘या’ 3 राशींवर होणार महादेव पार्वतीची विशेष कृपा; धनलाभाचे संकेत

Marathi News Live Updates : मिरवणूक बंदीकडे चाललेली पावले थांबली नाहीत तर भविष्यात उत्सवच बंद होतील - साऊंड असोसिएशन

Kharge Rally Controversy : मल्लिकार्जुन खर्गेंच्या रॅलीनंतर 'शुद्धीकरण' वाद पेटला! राज्यभरातून 80 तक्रारींनंतर पोलिसांचं मोठं पाऊल, काय आहे नेमकं प्रकरण?

SCROLL FOR NEXT