गुराच्‍या वाड्यावर डंपर कोसळला 
मुंबई

पोलादपूर येथे डम्पर उलटला

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : काटेतळी गावात सडवली हद्दीतील दगड खाणीतून मालवाहतूक करणारा डम्पर उतारावरून गुरांच्या वाड्यावर बुधवारी उलटला. या अपघातात दोन जण जखमी झाले असून गुरांच्या वाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दिशा दिलीप चव्हाण व गीता दिलीप चव्हाण (रा. काटेतळी) अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर पोलादपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सडवली हद्दीतील दगडाच्या खाणींमध्ये उत्खनन करण्यासाठी सुरुंग स्फोट करून दगड काढण्यात येतो. या स्फोटाचे हादरे गावातील सार्वजनिक मंदिर व काही घरांना बसल्याने मोठे नुकसान झाले आहे. या खाणीमध्ये जाण्यासाठी काटेतळी रस्त्याचा उपयोग केला जातो. या रस्त्यालगत शाळा असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

गावातील रस्त्यावरील अवजड वाहतूक बंद करण्यात यावी, या मागण्यांचे निवेदन काटेतळी सरपंच आरती मोरे व ग्रामस्थांनी पोलादपूर तहसील कार्यालय येथे दिले आहे. बुधवारी सकाळी साडेआठ वाजता काटेतळी गावात सडवली हद्दीतील दगड खाणीतून मालवाहतूक करणारा डम्पर उतारावरून गुरांच्या वाड्यावर उलटला. या अपघातात मालक संतोष बाळाराम मोरे यांच्या वाड्याचे नुकसान झाले असून गुरांना दुखापत झाली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kukadi Project : ‘कुकडी’त उच्चांकी ९३ टक्के पाणीसाठा; प्रकल्पातील धरणे भरल्याने रब्बी हंगामाची मिटली चिंता

Manchar News : उसनवारीच्या धान्यावर भूक भागविण्याची वेळ; आंबेगाव तालुक्यात २२ शाळांचा पुरवठा रखडला

Power Shake-Up in Shirur: शिरूर नगर परिषदेत सत्ताधारी गटाला तडे; शरद पवार गटाचे पाच नगरसेवक बाहेर पडल्याने समीकरणे बदलण्याची शक्यता

PNG Connection : चार लाख सदनिकांना महिनाभरात ‘पीएनजी’ जोडणी अनिवार्य

Rural Heart Attack Care : मंचर उपजिल्हा रुग्णालयातील तातडीच्या ‘थ्रॉम्बोलिसिस’ उपचाराने शेतकऱ्याचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT