आता शिवभोजन थाळी येणार थेट तुमच्या दारी..

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 29 January 2020

मुंबई : आता दहा रुपयातील शिवभोजन थाळी थेट तुमच्या दारात येणार आहे. २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिनाचं अवचित्य साधत महाराष्ट्र सरकारने १० रुपयांच्या शिवभोजन थाळीची प्रायोगिक तत्त्वावर सुरवात केली. अशातच आता राज्य सरकार बेस्ट उपक्रमाच्या दोन फिरत्या कॅंटीनमध्ये याच शिवभीजन थाळीची सुरवात करणार असल्याचं समजतंय.

या संदर्भातील आराखडा तयार झाल्यावर १० रुपयात जेवण देणारी शिवभोजन थाळी सुरु करण्यात येईल. दोन विशेष बसेसच्या माध्यमातून कोणत्या मार्गांवर ही शिवभोजन थाळी सुरु केली जाणार याबद्दल आढावा घेतला जाणार आहे. 

एक नंबर बातमी - अरुंद पायऱ्या, निसरडी वाट आणि धडकी भरवणारी दरी, अडीच वर्षांच्या तिने सर केला कलावंतीण

सध्या 'बेस्ट'मार्फत चालत्या फिरत्या कँटीनची योजना राबवली जातेय. या योगनेच्या माध्यमातून अनेकांना कमी किमतीत, परवडेल अशा भावांमध्ये खाद्यपदार्स्थ विकत घेता येतात. दरम्यान आता महाराष्ट्र सरकारतर्फे शिवभोजन थाळीची सुरवात करण्यात आली आहे. अशात गरजूंपर्यंत ही शिवभोजन थाळी पोहोचवण्यासाठी बेस्टमार्फत चालत्या फिरत्या कॅंटीनमध्ये १० रुपयातील थाळीची सुरवात करण्यात येणार आहे. मार्गांचा आढावा घेतल्यावर दोन बसगाड्यांची निवड केली जाणार आहे. 

घेताय का मग ? देशातील सर्वात स्वस्त इलेक्‍ट्रिक एसयूव्ही बाजारात, ग्राहकांच्या पडणार खरेदीसाठी उड्या 

मिळालेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे या चालत्या फिरत्या कॅंटीनमध्ये दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत 100 नागरिकांना शिवभोजन थाळी देण्याचे नियोजन करण्यात येतंय.  दरम्यान या योजनेबाबत बोलताना, ही सेवा लवकरच सुरू होईल, अशी माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक डॉ. सुरेंद्रकुमार बागडे यांनी दिली. सध्या कोणत्या मार्गांवर हे चालतं फिरतं कँटीन सुरु होणार याबाबत आढावा सुरु आहे. यानंतर हा आढावा बेस्ट सरकारसमोर सादर करेल आणि त्यानंतर यावर शिक्कामोर्तब होणार आहे.  

maharashtra governmet to start shivbhojan thali on mobile canteen run by best

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra governmet to start shivbhojan thali on mobile canteen run by best