File Photo 
मुंबई

ठाण्यात सीएए, एनसीआर विरोधात एल्गार; शनिवारी तिरंगा मोर्चा

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदवही (एनसीआर) या कायद्याच्या विरोधात शनिवारी (1 फेब्रुवारी) ठाणे शहरात तिरंगा मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये ठाणे जिल्ह्यातील सर्वधर्मीय नागरिक; तसेच विविध राजकीय पक्षांचे कार्यकते-नेते सहभागी होणार आहेत. या मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभेत रूपांतर होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा नगरसेवक नजीब मुल्ला यांनी दिली.

सीएए, एनसीआर आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एपीआर) या केंद्र सरकारने आणलेल्या कायद्यांचा फटका देशातील सर्वच घटकांना बसणार आहे. अनेकांना आपले नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी आवश्‍यक असलेली कागदपत्रे गोळा करणेही शक्‍य नाही. त्यामुळे ज्यांच्या अनेक पिढ्या या भारतात जन्माला आल्या; ज्यांचे मूळ हे भारतीय आहे; त्यांनाच डिटेंशन कॅम्पमध्ये टाकण्याचा या केंद्र सरकारचा उद्देश आहे. त्यामुळेच ठाण्यातील "कुल-ए-जमात' या संघटनेने पुढाकर घेत या मोर्चाचे आयोजन केले आहे.

मोर्चाची सुरुवात दुपारी 2 वाजता राबोडी येथून होणार असून मीनाताई ठाकरे चौक, आंबेडकर रोड, सिव्हिल रुग्णालय मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पॅव्हेलियन हॉटेलसमोर हा मोर्चा विसर्जित होणार आहे. या ठिकाणी मोर्चाचे रूपांतर एका सभेत होणार असून या वेळी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, माजी न्या. बी. जी. कोळसे-पाटील, सुषमा अंधारे, भालचंद्र कांगो, डॉ. रिचर्ड, पं. नरसिंग तिवारी, आईषी घोष, ऍड. राकेश राठोड, ऍड. गजानन चव्हाण, सुवर्णा सदवे आदी मान्यवर संबोधित करणार आहेत, असे नजीब मुल्ला यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kedgaon Crime : केडगावातील गर्भलिंग निदान रॅकेटची व्याप्ती मोठी; दोघेजण अद्याप फरार, आणखी काहींचा सहभाग असण्याची शक्यता

Abdul Sattar: अब्दुल सत्तारांची नाराजी दूर, मुलाचा उमेदवारी अर्ज उद्या माघारी घेणार

Donald Trump: मोज्तबा खामेनेई यांची भेट घेण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा; नेतन्याहू यांच्याशी वादावादीनंतर ट्रम्प यांचा भलताच प्लॅन

Pune Toxic Liquor Case: विषारी दारूसाठी रसायन पुरविणाऱ्या पिता-पुत्राला नवी मुंबईतून अटक; तपासासाठी दहा पथके

Lowest Price Electric Scooter : 50 हजारपेक्षा कमी किंमतीत इलेक्ट्रिक स्कूटर; सगळ्यात स्वस्त आहेत 'या' 3 गाड्या, दमदार रेंज

SCROLL FOR NEXT