मुंबई

वायू गळतीवर 'बलून टेक्नॉलॉजी'चा उतारा, दूषित हवेवरून वायू गळती शोधणार

मिलिंद तांबे

मुंबई: मुंबईत वारंवार होणाऱ्या वायू गळतीवर 'बलून टेक्नॉलॉजी'चा उतारा शोधण्यात आला आहे. रासायनिक कारखाने असणाऱ्या परिसरात दूषित हवेवरून वायू गळती शोधण्याचे नवे तंत्रज्ञान आहे. पूर्व उपनगरातील केमिकल बेल्टमध्ये ही टेक्नॉलॉजी वापरून तेथील वायू गळती नियंत्रणात आणणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. 

रासायनिक कारखाने असलेल्या परिसरातील दुषित हवा विशिष्ट फुग्यात भरून त्याची तपासणी केली जाणार आहे. ज्या भागात दुर्गंधी येते तेथील दुषित हवा विशिष्ट यंत्रांच्या सहाय्याने एका खास फुग्यात भरली जाते. या फुग्यातील हवेचे नंतर परिक्षण करून त्यात कोणत्या वायुचे किती प्रमाण आहे, कोणत्या वायुचे प्रमाण वाढले आहे का हे तपासण्यात येणार आहे. सध्या प्रयोगिक तत्वावर वापर करण्यात येणार असून लवकरच हे तंत्रज्ञान अग्निशमन दलात समाविष्ट करण्यात येणार असल्याची माहिती काकाणी यांनी दिली. 

मुंबईतील पूर्व उपनगरांत वायुगळतीचे प्रमाण वाढले आहे. वायुगळतीमुळे त्या परिसरातील स्थानिक रहिवाशांना त्रास सहन करावा लागतो. गेल्या काही वर्षात अशा वायुगळतीच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे अनेकांना उपचारासाठी दाखल करावे लागले. अशा कंपन्यांवर कारवाईचा बडगा देखील उगारावा लागतो. त्यामुळे अशा घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या मार्फत नवे तंत्रज्ञान आणले जात आहे. हे तंत्रज्ञान यापूर्वी ही होते मात्र ते फारसे वापरले जात नव्हते. मात्र वायुगळतीच्या घटना वाढल्या असून त्यासाठी पालिकेला जाब विचारला जात असल्याने पालिकेने ही प्रणाली सुरू कऱण्याचा निर्णय घेतला असल्याचे ही काकाणी पुढे म्हणाले.

पालिकेने याबाबत नुकताच एक आढावा घेतला असून पूर्व उपनगरांतील सर्व रासायनिक कंपन्यांनाही हे तंत्रज्ञान घेण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत. पूर्व उपनगरांत बीपीसीएल, एचपीसीएल, आरसीएफ अशा अनेक रासायनिक कंपन्या आहेत. तसेच महानगर गॅस लिमिटेडच्या गॅसवाहिन्यांचे जाळे मुंबईभर आहे. बऱ्याचदा  या परिसरात दुर्गंधी येण्याचे प्रकार घडतात. मात्र ही गळती नेमकी कुठून येते हे वेळेत कळत नाही. अनेक कंपन्या आपले हात वर करतात त्यामुळे नक्की वायुगळती कुठून होते हे समजत नाही. त्यामुळे गेल्या वर्षी पालिकेने मुंबईतील अशा रासायनिक कंपन्यांच्या प्रतिनिधींची आणि वायु प्रदुषणावर काम करणाऱ्या संस्था आणि महापालिका, अग्निशमन दल अशा 16 विविध प्रधिकरणांच्या प्रतिनिधींची समिती स्थापन केली होती.

वायुगळतीमुळे अनेकदा पालिकेवर दोषारोप ठेवला जातो. उशीर झाल्यास ब-याचदा वायुगळतीची चौकशी करण्यात अडथळा येतो. कंपन्या हात वर करतात. त्यामुळे बलून टेक्नॉलॉजी वापरण्यात येणार आहे. रासायनिक कंपन्यांना ही टेक्नॉलॉजी बसवण्याचा निर्देश दिले आहेत. मात्र कंपन्या ही टेक्नॉलॉजी सुरू करण्यात विलंब होत असल्याने पालिकेने ही टेक्नॉलॉजी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

पूर्व उपनगरात वायुगळतीच्या घटना घडत असतात. त्यामुळे तेथील अग्निशमन दलाच्या कार्यालयात ही टेक्नॉलॉजी सुरू करण्यात येणार आहे. एखाद्या ठिकाणी वायुगळती झाल्यास तेथील दुषित हवेचे नमूने ताबडतोब एका फुग्यात घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येतील. यामुळे नेमकी वायुगळती कुठून, किंवा कशामुळे, किती प्रमाणात झाली हे नेमके समजणार आहे. 
 
बलून टेक्नॉलॉजी फार खर्चिक नाही. मात्र यासाठी काही कर्मचा-यांना प्रशिक्षण द्यावे लागणार आहे. हे प्रशिक्षण पूर्ण झाले ही महिन्याभरात या प्रणालीचा वापर सुरू करण्यात येणार आहे.

-----------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Excerpt from Balloon Technology air leaks Detect air leaks from polluted air

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG : प्लेअर ऑफ दी मॅच पुरस्काराचा खरा मानकरी मी नाही... Sanju Samsonने विजयाचे श्रेय दिले दुसऱ्याला, मन जिंकणारे विधान; म्हणाला, तो नसता तर मी इथे उभा नसतो

ऐ बाई, बस खाली...! MS Dhoni ने जल्लोष करणाऱ्या साक्षीला का रोखले? IND vs ENG सामन्यातील सर्वात सुंदर क्षण Video Viral

T20 WC, IND vs ENG SF: टीम इंडिया फायनलमध्ये! २२ वर्षीय जेकब बेथलची कडवी झुंज अपयशी, ८ मार्चला जेतेपदासाठी न्यूझीलंडला भिडणार

Sukhoi Missing: मोठी बातमी! भारतीय वायुसेनेचं अत्यंत शक्तिशाली सुखोई फायटर जेट बेपत्ता; शोध मोहीम सुरु

Pune News : भाजप नगरसेवकांच्या निर्णयामुळे केंद्राच्या प्रकल्पाला अडथळा, ८ कोटींचा निधी परत जाण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT