Pooja Dadlani  
मुंबई

शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीची मुंबई पोलीस करणार चौकशी

पूजा ददलानीचं लोअर परळमधलं मर्सिडीज कारचं सीसीटीव्हीही फुटेज एसआयटीच्या हाती लागलं आहे.

सुरज सावंत

अभिनेता शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीने Pooja dadlani ड्रग्ज प्रकरणात आर्यनला वाचवण्यासाठी के. पी. गोसावीला KP Gosavi ५० लाख रुपये दिल्याचा गौप्यस्फोट सॅम डिसूझाने केला होता. एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत सॅम डिसूझाने हा दावा केला होता. याप्रकरणी आता मुंबई पोलीस शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीची चौकशी करणार आहे. मुंबई पोलिसांकडून नेमण्यात आलेल्या विशेष पथकाने पूजाला सोमवारी चौकशीसाठी बोलवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणात आतापर्यंत पाच जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.

कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात पंच असलेल्या प्रभाकर साईलने या प्रकरणात मध्यस्थ म्हणून सॅम डिसूझाचे नाव घेतले होते. आता याच आरोपाला बळकटी देणारे काही पुरावे समोर आले आहेत. शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीचं लोअर परळमधलं मर्सिडीज कारचं सीसीटीव्हीही फुटेज एसआयटीच्या हाती लागलं आहे. ५० लाख रुपयांची डील याच ठिकाणी झाल्याचं बोललं जातं आहे. किरण गोसावी आणि पूजा ददलानी यांच्यामध्ये डील झाल्याचा आरोप पंच प्रभाकर साईलने केला होता.

ड्रग्ज प्रकरणात आर्यनची सुटका करण्यासाठी किरण गोसावीने पूजा ददलानीला मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं. जर हे खरं असेल तर किरण गोसावीच्या विरोधात एसआयटी खंडणीचा गुन्हा नोंदवण्याची शक्यता आहे. यापूर्वी गोसावीवर दोन गुन्हे दाखल झाले आहेत. सॅम डिसूझा, पूजा ददलानी आणि गोसावी यांची लोअर परळमध्ये ३ ऑक्टोबर रोजी भेट झाली होती, असंही प्रभाकर साईलने सांगितलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

SCROLL FOR NEXT