पुनीत राजकुमार यांच्या डॉक्टरांना पोलीस संरक्षण

कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Puneeth Rajkumar
Puneeth Rajkumar file view

कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार Puneeth Rajkumar यांचं बेंगळुरूमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याच्या एका आठवड्यानंतर, त्यांच्या फॅमिली डॉक्टरांना पोलीस संरक्षण देण्यात आलं आहे. पुनीतच्या अनेक चाहत्यांनी वैद्यकीय निष्काळजीपणाचा आरोप केल्यामुळे पोलीस संरक्षण पुरवण्यात आलं आहे. बेंगळुरू शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदाशिवनगर इथल्या डॉ. रमणराव यांच्या निवासस्थान आणि क्लिनिकच्या बाहेर KSRP प्लॅटून तैनात करण्यात आली आहे. “कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी आम्ही या परिसरातील हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि गस्त वाढवत आहोत,” अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

खासगी रुग्णालये आणि नर्सिंग होम असोसिएशनने (PHANA) डॉ. रमणराव आणि पुनीत राजकुमार यांच्या उपचारात सहभागी झालेल्यांसाठी संरक्षण मागितल्यानंतर ही बाब समोर आली आहे. पुनीत यांच्या वैद्यकीय स्थितीबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते आणि हितचिंतकांनी प्रयत्न केल्याचं PHANA अध्यक्ष डॉ. प्रसन्न एच. एम. यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं. हे एखाद्या व्यक्ती किंवा कुटुंबाच्या आरोग्य सेवा गोपनीयतेचं उल्लंघन आहे, असंही त्यांनी पत्रात म्हटलंय.

Puneeth Rajkumar
Diwali Special: रिंकूचं खास लूक; 'परश्या'ची कमेंट वाचाच!

डॉ. प्रसन्न यांनी लिहिलं, “उपचार करणार्‍या डॉक्टरांवर, विशेषत: डॉ. रमणराव यांच्यावर लोकांनी निशाणा साधण्याला आमचा तीव्र विरोध आहे.” काही वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म दिवंगत अभिनेत्याला सेवा देणार्‍या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना दोष देत होते. अशा प्रकारचे वृत्त डॉक्टरांविषयी समाजात अविश्वास निर्माण करतात, असंही असोसिएशनने निदर्शनास आणलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com