Ravi Shastri  sakal media
मुंबई

गर्व आहे मला अलिबागकर असल्याचा; माजी कसोटीपटू रवी शास्त्री यांची प्रतिक्रिया

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : ३० वर्षांपूर्वी अलिबागमध्ये (Alibag) वास्तव्यास आलो. सध्या आवास- सासवणे येथे राहतो. या ठिकाणी शांतता आहे. त्यामुळे अलिबागकर असल्याचा अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया माजी कसोटीपटू रवी शास्त्री (Ravi shastri) यांनी शनिवारी (ता. १२) व्यक्त केली. अलिबाग- रेवस मार्गावरील कनकेश्वर फाटा येथे लोकसहभागातून ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ (Champion Of Champions sculpture ) हे रवी शास्त्री यांचे शिल्प तयार करण्यात आले आहे. त्याचे उद्‍घाटन करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री आदिती तटकरे, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, आमदार महेंद्र दळवी, आमदार भरत गोगावले, माजी आमदार पंडित पाटील, माजी आमदार मनोहर भोईर, जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती दिलीप भोईर, जिल्हा परिषद सदस्य आस्वाद पाटील, चित्रा पाटील, पंचायत समिती सदस्य समीहा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

शास्त्री म्हणाले की, अलिबाग तालुक्यात मोठ्या प्रमाणात टेनिस क्रिकेट खेळले जाते. येथील खेळाडूंना चांगल्या पद्धतीने व्यासपीठ मिळाल्यास येथील खेळाडूंची आयपीएलसाठी निवड होऊ शकते. येथील वातावरण मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी पोषक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT