दहिसरमधील कारखान्यास आग 
मुंबई

दहिसरमध्ये कारखान्याला आग

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : दहिसर पूर्वमधील केतकीपाडा येथील डायमंड इंडस्ट्रियल इस्टेटच्या चौथ्या मजल्यावर गुरुवारी (ता. ३०) दुपारी सव्वादोनच्या सुमारास अचानक आग लागली. या वेळी शेजारच्या गाळ्यातील कामगार जेवणासाठी खाली उतरले होते. त्यामुळे सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. आगीत चौथ्या मजल्यावरील गाळा क्रमांक ४३४ व ४३५ चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 

केतकी पाड्यातील डायमंडच्या इंडस्ट्रियल इस्टेटच्या चौथ्या मजल्यावर सिद्धांत डायमंड कंपनी आहे. कारखान्यात बॉयलर ठेवण्यात आला असून त्याच्या धुराचे लोट जाण्यासाठी चिमणी बसवण्यात आली आहे. गुरुवारी दुपारी गाळा बंद असताना अचानक त्यामधून धुराचे लोट येऊ लागले व काही वेळाने संपूर्ण गाळ्यात आग पसरली. आगीचे वृत्त समजताच स्थानिक शिवसेना शाखाप्रमुख प्रकाश पुजारी यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी धाव घेतली व अग्निशामक दल व पोलिसांना त्याची माहिती दिली. त्यानंतर अग्निशामक दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या व त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या वेळी रस्त्यावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

दहिसर पोलिसांनी हा रस्ता बंद करत गर्दीवर नियंत्रण मिळवले. आगीत कारखान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. दरम्यान, यापूर्वीही जवळील सागर इंडस्ट्रीज इस्टेटच्या एका गाळ्यात भीषण आग लागली होती. त्यावेळी सदर गाळ्यात मोठ्या प्रमाणात अंतर्गत फेरबदल करून ग्रिल लावून रस्ता बंद करण्यात आल्याचे उघड झाले होते. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवताना अग्निशामक दलाच्या जवानांना तारेवरची कसरत करावी लागली होती.

महत्त्वाची बातमी...घाटकोपरचा प्रवास गारेगार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT