ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष महादेव चौघुले यांचे निधन  
मुंबई

ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष महादेव चौघुले यांचे निधन

शरद भसाळे

भिवंडी : ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, माजी सभापती शिक्षण महर्षी महादेव चौघुले (76, रा. वडूनवघर, भिवंडी) यांचे शनिवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने निधन झाले.


महादेव चौघुले शुक्रवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी रक्तदाब वाढल्याने चक्कर येऊन भिंतीवर पडले होते. त्यांना कुटुंबीयांनी बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी तत्काळ मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचे शनिवारी (ता.२५) सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले व तीन विवाहित मुली, चार भाऊ असा 45 जणांचा एकत्रित परिवार आहे. ते गेल्या 35 वर्षांपासून सक्रिय राजकारण व समाज कार्यात कार्यरत होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व माजी मंत्री आमदार गणेश नाईक यांचे निकटवर्तीय मित्र होते. 

सध्या ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते. ठाणे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापतिपद देखील त्यांनी भूषविले होते. सध्या ते परिविक्षाधीन आणि अनुरक्षण संघटना (बाल सुधारगृह ) महाराष्ट्र राज्य, पुणे या संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांनी 20 वर्षांपूर्वी साई शिक्षण सेवा समिती या सामाजिक संस्थेची स्थापना केली. त्या माध्यमातून खार्डी (पायगांव), वडूनवघर येथे माध्यमिक शाळा, तर राहनाळ (अंजूरफाटा) येथे कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय तसेच लॉ आणि बी - फार्मसी कॉलेज सुरू करून शहरासह ग्रामीण भागातील गरीब गरजू, आदिवासी विद्यार्थ्यांची शिक्षणाची व्यवस्था केली आहे. चौघुले यांच्या निधनाने तालुक्‍यात हळहळ व्यक्त केली जात आहे. वडूनवघर येथील त्यांच्या मालकीच्या जागेत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 
-----------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI New Rule: UPI आता खरंच महागणार? ₹2,000 नंतर काय बदलणार; सामान्य माणसाला काय फटका, काय फायदा?

Gokul Election : नविद मुश्रीफ, चुयेकर, बाळासाहेब खाडेंचा अर्ज ४७० उमेदवारी अर्जांची विक्री ; ५४२३ संस्था मतदार; १८, १९, २० सप्टेंबरला सुटी

CM Birthday : दिव्यांग मुलांसोबत मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस; केक कापताना मुलांचे प्रेम पाहून झाले भावुक

Cow Milk Rates Rise To ₹43 Per Litre :दूध उत्पादन घटले; संस्थांत ‘पळवापळवी’ वाढली सणासुदीच्या मागणीसह दुष्काळी स्थितीचा परिणाम; गायीचे दूध ४३ रुपये

IND vs AFG : मॅच विनिंग खेळीनंतरही संजू सॅमसनला बाकावर बसवणार? श्रेयस अय्यरने दिले संकेत; कशी असेल टीम इंडियाची Playing XI?

SCROLL FOR NEXT