मुंबई

मालमत्ता गुंतवणूकीच्या नावाखाली 7 हजार गुंतवणूकदारांची फसवणूक, 700 कोटींना गंडा

अनिश पाटील

मुंबई:  मालमत्ता गुंतवणूकीच्या नावाखाली सात हजार गुंतणूकदारांची 700 कोटी रुपयांची फसवूणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने(ईओडब्ल्यू) बंगळुरूतील कंपनीच्या नऊ संचालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कंपनीच्या बंगळुरू आणि मुंबईतील कार्यालयावर आर्थिक गुन्हे शाखेने शोध मोहिम राबवली आहे. याप्रकरणी तपासासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे.

एक्सपॅट प्रोजेक्टस् अँड डेव्हलपमेंट प्रा. लि. आणि कंपनीच्या नऊ संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी लुक आऊट नोटीसही जारी करण्यात आली आहे. ही कंपनी बंगळुरू येथील नोंदणीकृत असून तिचे बंगळुरू, मुंबई आणि पुण्यात कार्यालये आहेत. मुंबईतील कुर्ला येथील कोहिनूर मॉलमध्ये कंपनीचे कार्यालय आहे. शेती आणि बिगर शेती जमिनीत गुंतवणूकीबाबत आमिष दाखवल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांनी गुंतवणूकदारांना 70 टक्के रक्कम हफ्त्यांनी भरायचे आणि 70 टक्के रक्कम झाल्यानंतर नोंदणी करून उर्वरीत 30 टक्के रक्कम भरायची योजना आणली होती. जर कंपनीत गुंतणूकदारांना प्लॉट देण्यास असमर्थ ठरली, तर उर्वरीत रक्कम अतिरिक्त दोन टक्के व्याजावर परत करेल असे आश्वासन दिली होते.

सुरूवातीला कंपनीने त्यांचे आश्वासन पूर्ण केले, पण त्यानंतर गुंतणूकदारांचे पैसे थकण्यास सुरूवात झाली. आर्थिक गुन्हे शाखेच्या प्राथमिक तपासात 2013 पासून सात हजार गुंतणूकदारांचे 700 कोटी रुपये थकले असल्याचे निष्पन्न झाले आहे. आतापर्यंत 400 हून अधिक गुंतवणूकदार कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखेकडे आले असून त्यांचे जबाब नोंदवण्यात आलेत. गुंतवणूकदारांमध्ये महाराष्ट्रातील पुणे आणि मुंबई, कर्नाटकातील बंगळुरू, गोवा आणि इतर राज्यांतील नागरिकांचाही समावेश आहे. काही गुंतवणूकदार अनिवासी भारतीयही असल्याचे अधिकाऱ्यानं सांगितले.  याप्रकरणी आम्ही गुन्हा दाखल केल्याचे सहपोलीस आयुक्त(आर्थिक गुन्हे) राजवर्धन सिन्हा यांनी सांगितले.

गुंतवणूकीच्या पैशांतून रायगडमध्ये जिल्ह्यात जागा खरेदी करण्यात आल्याचा संशय आहे. तरी कंपनीने हा पैसा कुठे गुंतवला आहे आहे, याबाबत आर्थिक गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे. याप्रकरणी भादंवि कलम 406, 409, 420, 120(ब), 34 सह महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायद्याच्या(एमपीआयडी) कलम 3 आणि 4 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गुंतवणूकीसाठी विशेष तपास पथकाची निर्मिती करण्यात आली आहे.

लिसलोत लुडूस्वामी रेड्डी यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचे 63 लाख 76 हजार रुपये यात गुंतवले होते. कंपनीचा पुण्यातही प्लॉट असून याप्रकरणी पुणे पोलिसांनीही एक गुन्हा दाखल केला असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

-----------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Fraud of 7 thousand investors in name of property investment fraud Rs 700 crore

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

Gadchiroli Threat: एटापल्लीतील जेएसडब्ल्यू अधिकाऱ्यांना ठार मारण्याची धमकी; ‘लाल सलाम’ पत्रकामुळे गडचिरोलीत खळबळ

SCROLL FOR NEXT