esakal | तेजस एक्सप्रेस 17 ऑक्टोबरपासून धावणार, आजपासून तिकीट आरक्षण सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

तेजस एक्सप्रेस 17 ऑक्टोबरपासून धावणार, आजपासून तिकीट आरक्षण सुरू

कोरोनाच्या पार्श्वभूवीर देशातील लांब पल्यांवरील नियमित रेल्वे सेवा बंद असताना 17 ऑक्टोबरपासून खासगी तेजस एक्स्प्रेस मात्र प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. ही एक्स्प्रेस मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणार आहे.

तेजस एक्सप्रेस 17 ऑक्टोबरपासून धावणार, आजपासून तिकीट आरक्षण सुरू

sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूवीर देशातील लांब पल्यांवरील नियमित रेल्वे सेवा बंद असताना 17 ऑक्टोबरपासून खासगी तेजस एक्स्प्रेस मात्र प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. ही एक्स्प्रेस मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणार असून, प्रवासादरम्यान प्रवाशांना सुरक्षा किट देण्यात येणार आहे. ज्यामध्ये मास्क, सनिटायझर, फेस शिल्ड आणि हॅण्ड ग्लोव्हज असणार आहे. त्यामुळे  8 ऑक्टोबर पासून या गाडीचे आरक्षणही सुरु करण्यात येणार असल्याची माहिती इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशने (आयआरसीटीसी)ने दिली आहे.

आयआरसीटीसीने मुंबई- अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस, दिल्ली-लखनऊ तेजस एक्स्प्रेस आणि काशी महाकाल एक्स्प्रेस कोरोनामुळे रद्द केल्या होत्या. मात्र आता दुर्गा पुजा, दसरा आणि दिवाळी सणानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांच्या मागणीमुळे खासगी तेजस एक्स्प्रेस सुरु करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. त्यानुसार आयआरसीटीसी तेजस एक्स्प्रेस चालविण्यासाठी सज्ज झाले आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करता यावे याकरिता उपलब्ध आसन क्षमतेच्या 50 टक्केच आसन आरक्षित ठेवण्यात येणार आहेत. तसेच एकदा आसनस्थ झाल्यानंतर प्रवासी आपले आसन बदलू शकणार नाहीत.

मुंबईतील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

त्याशिवाय प्रवासादरम्यान प्रवासी आणि कर्मचारी यांनी मास्क आणि फेस कवर लावणे बंधनकारक आहे. कोचमध्ये प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येक प्रवाशांना थर्मल स्क्रीनिंग आणि हातांची स्वच्छता करावी लागणार आहे. तसेच प्रवाशांचे सामान वारंवार सनिटाईज केले जाणार आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

अधिक वाचाः  वीज ग्राहकांना दरवाढीसह सरासरी बिलाचा शॉक; सरकारला ग्राहकांना दिलासा देण्याची संधी

------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Tejas Express Mumbai Ahmedabad starts from October 17 ticket reservation starts today

loading image