मुंबई

नियमांचं काटेकोरपणे पालन करत दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप

पूजा विचारे

मुंबईः लाडक्या बाप्पांना रविवारी दीड दिवस पूर्ण होताच भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदा  ना ढोल-ताशांचा गजर, ना गुलालाची उधळण, ना फटाक्यांची आतषबाजी, ना भलीमोठी मिरवणूक पाहायला मिळाली. कोरोनाचे संकट दूर ठेवण्यासाठी अनेक कुटुंबांनी घरातच गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याला प्राधान्य दिलं तर, मोठमोठी मंडळे आणि गृहनिर्माण संस्थांनी देखील यंदा दीड दिवसातच गणेशोत्सव आटोपता घेतल्याचं चित्र पाहायला मिळालं.

कोरोना साथीचे संकट असल्यामुळं यंदा गणेशोत्सवाच्या आनंदावर विरजण पडले आहे. त्यामुळं सोशल डिस्टन्सिंग आणि शांततेत गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. मुंबई महापालिकेनं नियमांचं उल्लंघन होऊ नये म्हणून कृत्रिम तलावांची सोय केली आहे. 

दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन घरापासून जवळ असावं म्हणून मुंबई महापालिकेनं शिवाजी पार्क येथे सोसायटीच्या दारात वाहन आरोहीत विसर्जन हौद उभा केला होता. मुंबईत दीड दिवसाच्या गणपतीचे मुंबईतील दादर येथील कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आलं. तसंच गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी विशेष फिरत्या कृत्रिम हौदांची निर्मिती करण्यात आली होती. विसर्जनासाठी मोजक्याच व्यक्तींना प्रवेश दिला जात होता. विसर्जनासाठी फुलणारी दादर चौपाटी यंदा सुनीसुनी होती.

मुंबईत शनिवारी गणरायाचे मोठ्या उत्साहात घरोघरी आगमन झाले होते.  अनेकांच्या घरी परंपरेनुसार दीड दिवसांच्या गणपतीचे आगमन झाले होते. काल दुसऱ्या दिवशी दुपारनंतर दीड दिवस पूर्ण होताच या गणपती मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.

सायंकाळी ६ वाजेपर्यंत दीड दिवसांच्या ३१ हजार २५५ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यापैकी ४२२२ मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले. त्यात सार्वजनिक ६२१, घरगुती ३० हजार ६३४ गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले होते. दरम्यान, महापालिकेने गणपती विसर्जनासाठी चोख व्यवस्था ठेवली होती. तर ठाणे जिल्ह्यात यंदा प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या सव्वा लाख गणेशमूर्तीपैकी ४० हजारांहून अधिक गणेशमूर्तीचे रविवारीच विसर्जन पार पडले.

Ganpati Visarjan 2020 one and half days ganpati immersion mumbai thane

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

D.K. Shivkumar: डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रियांका गांधींचा मोठा रोल; इनसाइड स्टोरी आली समोर

Crude Oil: होर्मुझ तणावात भारताचा 'ऑइल मास्टरस्ट्रोक’! कच्चे तेल आणण्यासाठी नवा मार्ग; रशिया ठरला गेमचेंजर...

Latest Marathi News Live Update : विशाळगडावरील कुर्बनीला कोल्हापूर सर्किट बेंचकडून परवानगी

Koyna Dam : कोयना धरणाची पाणीपातळी खालावली; सातारा-सांगलीसह संपूर्ण राज्याची धाकधूक वाढली, 'महाजनकोची' वीजनिर्मिती बंद पडल्यास काय होणार?

Chanakya Life Guide : लोक अचानकपणे तुम्हाला इज्जत देणं का बंद करतात? तुमचं कुठं चुकतं पाहा

SCROLL FOR NEXT