CM Eknath Shinde  Sakal
मुंबई

ठाकरेंना शिवसेना पक्षप्रमुख का म्हटलं नाही? CM शिंदेंनी उत्तर देणं टाळलं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माजी मुख्यमंत्री म्हणत उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

सकाळ डिजिटल टीम

शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने मातोश्रीवर शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. मात्र सर्वात जास्त चर्चा आहे ती म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या शुभेच्छांची. त्यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख असा न करता माजी मुख्यमंत्री असा केला आहे. (CM Eknath Shinde Wishes Happy Birthday to Uddhav Thackeray)

शिवसेनेतून ऐतिहासिक बंड करुन वेगळे झालेले एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहेत. आत्ताही ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आपल्या ट्वीटमध्ये एकनाथ शिंदे म्हणतात, "महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना."

या शुभेच्छांनंतर मात्र चर्चांना उधाण आलं. उद्धव ठाकरेंचा उल्लेख एकनाथ शिंदेंनी शिवसेना पक्षप्रमुख न करता माजी मुख्यमंत्री असा केला. याविषयी एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारण्यात आला. मात्र, या प्रश्नाचं उत्तर देणं शिंदेंनी टाळलं आणि तिथून निघून गेले. मी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, एवढंच शिंदे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT