मुंबई

कोरोनामुक्त रुग्णांमध्ये आरोग्य समस्या? आरोग्याची काळजी घेण्याचे तज्ज्ञांचे आवाहन

भाग्यश्री भुवड

मुंबई : कोरोनाचा संसर्ग झालेले अनेक रुग्ण उपचारानंतर बरे होऊन सुखरूप घरी परतले आहेत; पण कोरोनातून मुक्त झालेल्या अनेक रुग्णांमध्ये विविध शारीरिक आजार बळावत असल्याचे चित्र आहे. यात ऑगस्ट ते ऑक्‍टोबर 2020 या महिन्यात कोव्हिडमधून बाहेर आलेल्या बऱ्याच रुग्णांना श्‍वसनाशी संबंधित आजार झाला आहे; तर 15 टक्के रुग्णांना थकवा जाणवत आहे. सात टक्के रुग्णांमध्ये फुप्फुसाचा फायब्रोसिस झाल्याच्या तक्रारी आहेत, अशी माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली. 

सध्या कोरोनातून बरे झालेल्या अनेक रुग्णांना पुन्हा कोरोनाचा संसर्ग होत आहे. अशावेळी आजारातील गुंतागुंत वाढू शकते. जगभरात अशी अनेक प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. विशेषतः कोव्हिडच्या प्रोटोकॉलनुसार उच्चरक्तदाब, मधुमेह आणि लठ्ठपणा या समस्येने पीडित लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्‍यक आहे. या लोकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांना या आजाराचा संसर्ग होण्याच्या धोका अधिक असतो. त्याचप्रमाणे कोरोनातून बाहेर आलेल्या बऱ्याच रुग्णांना स्नायू, सांधेदुखी, अंगदुखीचा त्रास जाणवतो. अशावेळी वेळीच निदान व उपचार करणे गरजेचे आहे. अन्यथा गुंतागुंत अधिक वाढल्यास ती प्राणघातक ठरू शकते, असा इशारा अपोलो क्‍लिनिक पल्मोनोलॉजिस्ट डॉ. कुंदन मेहता यांनी दिला. त्या म्हणाल्या, कोव्हिडमुक्त झालेल्या 100 रुग्णांपैकी 15 टक्के लोकांमध्ये पोस्ट-कोव्हिडची लक्षणे दिसून येत आहेत. यात 15 टक्के रुग्णांना थकवा जाणवत आहे, तर सात टक्के रुग्णांमध्ये फुप्फुसाचा फायब्रोसिस झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. याशिवाय पायात गुठळ्या झाल्याची माहितीही रुग्णांनी दिली. मधुमेह, उच्चरक्तदाब, दमा आणि लठ्ठपणा असणाऱ्या लोकांना अधिक त्रास होऊ शकतो. क्वचितप्रसंगी 1000 मधील दोन जणांना हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा झटका येऊ शकतो. कोरोनाची लागण झाल्यानंतर न्यूमोनिया झालेल्यांना दीर्घकालीन काळजी घ्यावी लागते. या रुग्णांनी कोरोनातून ठणठणीत बरे झाल्यानंतरही आरोग्याकडे दुर्लक्ष करू नयेत. तब्येत ठीक नसल्यास तातडीने डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. 

कोव्हिडमधून बरे झालेल्या रुग्णांना स्नायू दुखणे, सांधेदुखी, थकवा, घसा खवखवणे, शरीरावर वेदना आणि अगदी श्‍वासोच्छवासाच्या तक्रारी जाणवत आहेत. ते रुग्णालयात उपचाराकरिता येत आहेत. कोमट पाणी प्यावे. धूम्रपान आणि मद्यपान टाळावे. पुरेशी विश्रांती घ्यावी आणि योग किंवा ध्यान करावे. जर घसा खवखवत असेल तर मीठ आणि पाण्याने गुळण्या करणे आवश्‍यक आहे. कोव्हिडची कुठलीही लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा. 
- डॉ. कुंदन मेहता,
पल्मोनोलॉजिस्ट, अपोलो क्‍लिनिक 


Health problems in corona free patients Health experts appeal

-----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Budget 2026: कर्करोग-मधुमेह निदानासाठी योजना ते राज्यात शहरी आरोग्य आयुक्तालय... महाराष्ट्र बजेटमध्ये आरोग्य क्षेत्रासाठी तरतूदी काय?

Shivaji Maharaj: मराठा इतिहासाला नवं बळ! आग्रा-पानिपत स्मारकांसह शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांसाठी बजेटमध्ये मोठी घोषणा

Dattatray Bharane farmers statement : शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेनंतर कृषीमंत्री दत्ता भरणे म्हणाले, "५० हजार रुपये शेतकऱ्यांना मोठा आधार..."

Latest Marathi News Live Update : होकर्स युनियनतर्फे आझाद मैदानात १२ मार्चला आंदोलन होणार

Third Mumbai: राज्यात तिसरी मुंबई उभारणार, सरकारचा ऐतिहासिक निर्णय, कुठे आणि कसा असेल प्लॅन?

SCROLL FOR NEXT