esakal | कॉमेडी क्वीन भारती सिंगला चार तासांच्या चौकशीनंतर NCBकडून अटक
sakal

बोलून बातमी शोधा

कॉमेडी क्वीन भारती सिंगला चार तासांच्या चौकशीनंतर NCBकडून अटक

 चार तासांच्या चौकशीनंतर केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने(एनसीबी) अखेर कॉमेडी क्वीन भारती सिंगला अटक केली. तिच्या कार्यालय व घरात एनसीबीने टाकलेल्या छाप्यात 86.5 ग्रॅम गांजा सापडला आहे.

कॉमेडी क्वीन भारती सिंगला चार तासांच्या चौकशीनंतर NCBकडून अटक

sakal_logo
By
अनिश पाटील

मुंबई - चार तासांच्या चौकशीनंतर केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने(एनसीबी) अखेर कॉमेडी क्वीन भारती सिंगला अटक केली. तिच्या कार्यालय व घरात एनसीबीने टाकलेल्या छाप्यात 86.5 ग्रॅम गांजा सापडला आहे.

हेही वाचा - नागपाडा दुर्घटनेतील इमारत मालकाचा जामीन नामंजूर; खबरदारीअभावी घडली घटना

याप्रकरणी एनसीबीला मिळालेल्या माहितीच्या आधारे खार दांडा येथे छापा टाकून 21 वर्षीय संशयीत वितरकाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे एलएसडीचे 15 ब्लॉट्स, 40 ग्रॅम गांजा व नाट्राझेपम  सापडले. याप्रकरणी आरोपीची चौकशी व इतर माहितीच्या आधारे कॉमेडी क्वीन भारती सिंगचे घर व प्रोडक्शन कार्यालयात एनसीबीने छापे मारले. त्यात 86.5 ग्रॅम गांजा सापडला आहे. त्यानंतर त्यांना दोघांना एनसीबी कार्यालयात नेण्यात आले.

भारती मर्सीडिज कारमधून तर हर्षला एनसीबीच्या वॅनमधून कार्यालयात नेण्यात आले. तेथे भारती व तिचा पती हर्ष लिम्बाचिया यांची एनसीबीच्या अधिका-यांनी चौकशी केली. त्यात त्यांनी गांजाचे सेवन करत असल्याचे दोघांनीही मान्य केले. चार तास चौकशीनंतर भारती सिंगला अटक करण्यता आली असून तिच्याविरोधात अंमली पदार्थ प्रथिबंधक कायद्या अंतर्गत अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी हर्षची चौकशी रात्री उशीरापर्यंत करण्यात आली. याशिवाय आणखी एका कारवाईत एमडी वितरणाप्रकरणी दोन वॉर्डेट आरोपींना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा राज्यातील 14,233 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्या लवकरच प्रसिद्ध होणार

एनसीबीने बॉलीवूनडमधील ड्रग्स वितरकांविरोधात जोरदार मोहिम चालवली असून त्यात वितरकांसह बॉलीवूडशी संबंधीत काही व्यक्तींचीही नावे समोर आली होती. नुकतीच अभिनेता अर्जून रामपालची एनसीबीने चौकशी केली होती. त्यासोबत प्रसिद्ध निर्माता फिरोज नाडियादवाला याचीही एनसीबीने चौकशी केली होती त्यानंतर आता भारती सिंगला अटक करण्यात आली आहे

Comedy Queen Bharti Singh arrested after four hours of interrogation 

-------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image