मुंबई

पोलिसांच्या क्वारंटाईन हॉटेलमध्ये झिंगाट हुक्का पार्टी; व्हिडीओ व्हायरल झाल्याने प्रशासन हादरले

दीपक शेलार : सकाळ वृत्तसेवा

ठाणे : ठाणे पोलिसांसाठी क्वारंटाईन सेंटर असलेल्या हाॅटेलमध्ये तरुणांच्या गटाने झिंगाट हुक्का पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. माजिवडा नाक्यावरील कॅपिटल हाॅटेल येथे घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले. त्यानंतर त्यांनी पार्टी करणार्‍या बारा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. कोरोना काळात झालेल्या या पार्टीत सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवण्यात आल्याने संसर्गाचा धोका अधिकच वाढला आहे

ठाण्याच्या माजिवडा नाक्यावरील कॅपिटल हाॅटेल हे माजी ठाणे मनपा आयुक्त विजय सिंघल यांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या क्वारंटाईनसाठी आरक्षित केले होते. या हाॅटेलमधील 32 पैकी 25 खोल्या या कोरोनासदृश्य लक्षणं आढळणार्‍या पोलिसांना दिल्या जात होत्या. याठिकाणी त्यांना क्वारंटाईनचीही सोय केली होती. मात्र सलग पाच दिवस एकाच व्यक्तीच्या नावे हॉटेल कपिटलमध्ये रूम बुक करण्यात आली होती. याठिकाणी पार्टीमध्ये गाण्यांच्या तालावर झिंगाट डान्स सुरू होता. त्यात 10 ते 15 जण विना मास्क नाचत असल्याचे वायरल झालेल्या व्हिडिओतून समोर आले. या प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी याठिकाणी धाव घेत हाॅटेल रुमची तपासणी केली असता कोणताही मुद्देमाल सापडला नाही. सदर हाॅटेलच्या रुममध्ये पार्टी करणार्‍या प्रत्येकाला नोटीस बजावण्यात आली आहे.त्यानुसार या प्रकरणी पुढील कारवाई केली जाईल.अशी माहिती चितळसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक जितेंद्र राठोड यांनी दिली.

-----------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRPF Recruitment Row : एसआरपीएफ पोलिस भरती पेपरात ८५ प्रश्न ‘कॉपी-पेस्ट’; राज्यभर संताप, युद्धपातळीवर चौकशी सुरू

मी राजीनामा देणार नाही, भाजपने कट रचून हरवलंय; ममता बॅनर्जींचे गंभीर आरोप, पराभवानंतर घेतली पत्रकार परिषद

दररोज १५० बालकांवर अत्याचार; समाज अजूनही का गप्प? बालसुरक्षेचा ज्वलंत प्रश्न ऐरणीवर; धक्कादायक आकडेवारी समोर

Business Scheme: बिझनेस सुरू करायचाय? सरकारच्या या 5 योजना बदलतील तुमचं नशीब, मिळू शकतं तब्बल 2 कोटींपर्यंत कर्ज!

Latest Marathi News Live Update : पुरंदर विमानतळ जमीन अधिग्रहण शेवटच्या टप्प्यात

SCROLL FOR NEXT