अभिनेत्रीचा आक्षेपार्ह व्हिडीओ काढत खंडणीची मागणी; पोलिसांनी दाखल केला गुन्हा

अनिश पाटील - सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 July 2020

अभिनेत्रीच्या तक्रारीवरून सांताक्रूझ पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बलात्कारसह माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्या अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई ः भोजपूरी चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्रीला तिचे अश्लिल व्हिडिओ सोशल मिडियावर वायरल करण्याची धमकी देऊन खंडणी मागितल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. या अभिनेत्रीच्या तक्रारीवरून सांताक्रूझ पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बलात्कारसह माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्या अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिशन ब्रेक द चैन! नवी मुंबईच्या आयुक्तांनी कोरोना विरोधात थोपटले दंड; 'ही' रणनिती तयार

ओशिवरा परिसरात राहणारी 28 वर्षीय अभिनेत्री भोजपूरी चित्रपटांमध्ये काम करते. पीडित अभिनेत्री आरोपीला 2016 पासून ओळखते.  तक्रारीनुसार, आरोपीने चित्रपटाच्या शुटींग दरम्यान अभिनेत्रीशी जवळीकता साधली. तसेच तिला लग्नाचे आणि चित्रपटात काम देण्याच्या नावाखाली तिच्याशी शारिरीक संबध ठेवले. या दरम्यान त्याने अभिनेत्रीच्या न कळत तिचा अश्लील व्हिडिओ काढला होता.  तसेच पीडित अभिनेत्रीचा कोलकत्ताचा दिग्दर्शक मित्र मुंबईत आला असताना. त्याची मुंबईत राहण्याची व्यवस्था नसल्याने तो अभिनेत्रीकडे थांबला होता. त्यावेळी आरोपींनी त्या दोघांचे छुप्या कॅमेऱ्याने व्हिडिओ काढले. तसेच आरोपी आणि त्याच्या मित्रांनी अभिनेत्रीच्या घरात घुसून तिच्या मित्रालाही मारहाण केली. गंभीर बाब म्हणजे आरोपींना अभिनेत्रीला फोन करून पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास ते व्हिडिओ सोशल मिडियावर वायरल करण्याची धमकी दिली, असे तक्रारीत म्हटले आहे.

रिझर्व्ह बॅंकेच्या सूचनांना केराची टोपली! हफ्ते भरण्यासाठी फायनान्स कंपन्यांचा ग्राहकांवर दबाव

या प्रकरणी अभिनेत्रीने चार जणांविरोधात सांताक्रूझ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. अभिनेत्रीच्या तक्रारीनुसार सांताक्रूझ पोलिसांनी चारही आरोपींविरोधात 376, 377, 354(क), 384, 365, 323, 452, 504, 34 भा.द.वि कलमांसह  माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 67(अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी सांताक्रूझ पोलिस अधिक तपास करत आहे.

---------------------------------

संपादन - तुषार सोनवणे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand ransom for offensive video of actress; complaint filed with police