Crime News esakal
मुंबई

Thane Crime: पतीनं केली पत्नी अन् दोन चिमुकल्यांची हत्या; ठाण्यातील संतापजनक घटना

दारुच्या व्यसनानं ग्रासलेल्या या तरुणानं स्वतःचंच कुटुंब संपवलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

ठाणे : एका तरुणानं पत्नीसह दोन लहान मुलांची हत्या केल्यानं ठाणे शहर हादरलं आहे. कुटुंबातील तिघांची हत्या करुन हा तरुण फरार झाला आहे. दारुच्या व्यसनानं ग्रासलेल्या या तरुणानं स्वतःचच कुटुंब संपवलं आहे, त्यामुळं सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. (Husband kills wife and two children Outrageous incident in Thane)

लाकडी बॅटनं केली मारहाण

माध्यमातील वृत्तानुसार, अमित धर्मवीर बागडी असं आरोपीचं नाव असून त्यानं आपल्या २४ वर्षीय पत्नीची आणि ८ वर्षीय मुलगी आणि १० वर्षीय मुलाची हत्या केली. लाकडी बॅटनं मारहाण करत त्यानं या तिघांची हत्या केली आहे. (Marathi Tajya Batmya)

ठाण्याजवळील कासारवडवली इथं ही घटना घडली. दारुच्या व्यसनाच्या आहारी गेलेल्या पतीला अर्थात अमित बागडी याला कंटाळून त्याची पत्नी त्याच्याजवळ राहत नव्हती. पत्नी आपल्यासोबत राहत नसल्याच्या रागातूनच त्यानं थेट ती राहत असलेल्या ठिकाणी जाऊन हे माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य केलं आहे. (Latest Marathi News)

आरोपी फरार

तिघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आल्यानं पोलिसांना याची खबर मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलीस आता पुढील तपास करत आहेत, पण आरोपी कुटुंब प्रमुख सध्या फरार झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT