Indigo planes file photo esakal
मुंबई

Mumbai News: मुंबई विमानतळावर इंडिगो विमानाचे पार्किंग ब्रेक फेल! दोष वेळीच लक्षात आल्याने दुर्घटना टळली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईहून छत्रपती संभाजीनगरला निघालेल्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाचे पार्किंग ब्रेक फेल झाल्याचे वैमानिकाच्या लक्षात आल्याने ‘टेक ऑफ’ होणारे विमान ऐनवेळी थांबविण्यात आले आणि पुढचा अनर्थ टळला.

सोमवारी (ता. ११) सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडल्यानंतर विमानाची फेरी रद्द करण्यात आली.

विमानाचे ‘टेक ऑफ’ झाले असते, तर मोठी दुर्घटना घडली असती. विमानात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी निघाले होते. दुर्घटनेबाबत त्यांनी ‘सकाळ’ला माहिती दिली. (Indigo planes parking brake failed at Mumbai airport accident avoided defect noticed in time Mumbai News)

विमानात १५० प्रवासी

मुंबई विमानतळावरून इंडिगो एअरलाइन्सचे विमान १५० प्रवासी घेऊन छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी ‘टेक ऑफ’साठी सज्ज होते. विमान धावपट्टीवरून उडण्यासाठी तयार होत असतानाच त्याचे टायर फुटले.

त्यामुळे ते थांबविण्यात आले. टायर बदलून पुन्हा उडण्यासाठी ते सज्ज झाले. मात्र ‘टेक ऑफ’ करण्याच्या आधीच विमानाचे पार्किंग ब्रेक फेल झाल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले. वैमानिकाने आवश्यक त्या सूचना प्रवाशांना देण्याचे सांगून विमान थांबवले.

त्यामुळे पुढचा अनर्थ टळला. वैमानिकाने प्रसंगावधान दाखवल्याने मोठी दुर्घटना टळली. त्यामुळे विमानातील प्रवाशांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला.

"विमानात एकाचवेळी दोन त्रुटी होत्या. त्या वेळीच लक्षात आल्याने अनर्थ टळला. ‘टेक ऑफ’ झाल्यानंतर दोष लक्षात आला असता, तर मोठी दुर्घटना घडली असती. आम्ही सारे प्रवासी वाचलो."- ॲड. उज्ज्वल निकम, विशेष सरकारी वकील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ARG vs Austria : लिओनेल मेस्सीचा विश्वविक्रमी गोल पाहिलात का? ज्याने अर्जेंटिनाला Fifa World Cup च्या पुढील फेरीत पोहोचवले Video Viral

Lionel Messi ने इतिहास रचला! वर्ल्ड कपमध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला; पेनल्टी हुकली, पण विक्रमाची संधी साधली...

Argentina vs Austria : ५६ वर्षानंतर चमत्कार झाला... लिओनेल मेस्सीचा World Cup मध्ये दरारा, ९६ वर्षांच्या स्पर्धा इतिहासात तिघांनाच हा पराक्रम जमलाय...

England Squad vs India T20I: भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; वैभव सूर्यवंशीला रोखण्यासाठी २२ वर्षीय ऑलराऊंडरला संधी

LPG Shortage: पुन्हा गॅस संकट! कतारमधील गॅस प्लांटमध्ये भीषण स्फोट; १३ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये भारतीयांचा समावेश

SCROLL FOR NEXT