Sushma Andhare News: पालकमंत्री दादा भुसेंनी लपविले ड्रग्जप्रकरण : सुषमा अंधारे यांची टीका

गृहमंत्र्यांनी ठरविल्यास बड्या भाभीचे कारनामे उघड
Shiv Sena deputy leader Sushma Andhare speaking at a meeting held here on Monday on the occasion of Mahaprabodhan Yatra.
Shiv Sena deputy leader Sushma Andhare speaking at a meeting held here on Monday on the occasion of Mahaprabodhan Yatra.esakal

नाशिक : महिलांना ब्युटी पार्लर टाकायचे असले तरी दहा प्रकारच्या परवानगी घ्याव्या लागतात, ललित पाटील (पानपाटील) ड्रग्जचा कारखाना टाकत असताना सर्व यंत्रणा गप्प कशा होत्या? पालकमंत्री दादा भुसे यांना यासंदर्भात सर्व माहिती असूनही त्यांनी कळवले नाही असा आरोप शिवसेनेच्या उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज येथे केला.

छोटी भाभी व चिपड्या यांची नावे उघड झाली, मात्र बडी भाभीचे नाव प्रकाशात आणले गेले नाही. पोलिसांनी खोलात शिरून तपास केल्यास कारनामे उघड होतील असा हल्लाबोल अंधारे यांनी नाव न घेता भाजपवर केला. (Sushma Andhare statement criticism on Guardian Minister Dada Bhuse hide MD drug case nashik political)

महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने नाशिक दौऱ्यावर आलेल्या श्रीमती अंधारे यांनी शिवसेना भवनमध्ये पत्रकार परिषद घेतली.त्यानंतर त्यांची जाहीर सभा झाली. या दोन्हीत त्यांनी महायुतीवर हल्लाबोल चढविला.

सामाजिक भान ठेवून एमडी प्रकरणाचा गृह खात्याने तपास करणे अपेक्षित होते. परंतु हा प्रश्न त्यांनी प्रतिष्ठेचा केला. परिणामी एमडी ड्रग्ज प्रकरणाचे मूळ बाजूला पडले.

मूळ गुन्ह्यात कशी अटक झाली? पानपाटील येरवडा तुरुंगात कोणाच्या व कसा संपर्कात होता? कारखाना टाकताना त्याला कुठल्या राजकीय नेत्यांची मदत झाली. या सर्वांची माहिती समोर येणे गरजेचे आहे. मातोश्रीवर पाटील याला कोणी आणले, याचा सिक्वेन्स देखील लक्षात घेणे गरजेचे आहे.

मातोश्रीवर येण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुखांचा गेट पास लागतो असे सांगून त्यांनी दादा भुसे यांच्याच गेटपासमुळे पाटील हा मातोश्रीवर आल्याचे सांगितले. अद्वय हिरे यांच्यावर चुकीच्या पद्धतीने कारवाई होत आहे.

हिरे तुरुंगात असताना वैदिक उपचार दिले जात नाही. मात्र पानपाटील हा नऊ महिने रूग्णालयात कसा राहिला? ससून रुग्णालयाचे डीन संजीव ठाकूर यांना अटक करा व त्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी अंधारे यांनी केली.

एमडी ड्रग्ज प्रकरणी चालू अधिवेशनात देखील युवा नेते आदित्य ठाकरे व विरोधी पक्षनेते अनिल परब, अंबादास दानवे हे लक्ष वेधणार असल्याचेही अंधारे म्हणाल्या.

Shiv Sena deputy leader Sushma Andhare speaking at a meeting held here on Monday on the occasion of Mahaprabodhan Yatra.
Sushma Andhare News: उद्धव ठाकरेंमुळे निवडून आलेले गाताहेत मोदींचे गुणगान : सुषमा अंधारे

चिपड्याचा शोध घ्या

छोटी भाभी म्हणजे नसरीन शेख, चिपड्या म्हणजे इमरान की इरफान शेख असा उल्लेख आहे. दोघांवरही कारवाई झाली पाहिजे. मात्र बडी भाभीचे नाव माहिती असली तरी थेट नाव उघड करणे कायदेशीर संकेताला धरून नाही.

पोलिसांपर्यंत नाव व कारनामे पोचवले असून त्यांनी व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवले तर बडी भाभी कोण हे स्पष्ट होईल. चिपड्या नावाचा उल्लेख आल्याने पदाधिकारी कोणाचा समर्थक असा प्रश्न विचारल्यानंतर त्यावर त्यांनी बोलणे टाळले.

भाजपने पटेलांचा पुतळा का उभारला?

बी. डी. भालेकर मैदानावर आयोजित सभेत बोलताना अंधारे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या,‘ स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी भाजपला खरच आदर असता तर त्यांनी गुजरातमध्ये सरदार

वल्लभभाई पटेल यांच्याऐवजी सावरकरांचा पुतळा उभारला असता. भाजपसह शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांचीही पोलखोल करताना त्या म्हणाल्या, खासदार श्रीकांत शिंदे यांनी संसदेत हनुमान चालिसा म्हटली, हे चांगले आहे.

पण मतदारसंघातील लोकांच्या भावना त्यांना कळल्या पाहिजेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कष्टाने निर्माण केलेल्या वारूळात आता निष्ठावान भाजपच्या मुंग्यांना बाजूला करून सत्तेचे नागोबा राहत असल्याचे त्यांनी म्हटले.

पालकमंत्री भुसे व खासदार हेमंत गोडसे यांच्यावरही सडकून टीका केली. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यासह अनेक नेते व्यासपीठावर उपस्थित होते.

Shiv Sena deputy leader Sushma Andhare speaking at a meeting held here on Monday on the occasion of Mahaprabodhan Yatra.
Ajit Pawar, Sharad Pawar नागपुरात, वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला जाणार? | NCP Political Crisis

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com