Rapper_Raj Mungase_Jitendra Awhad 
मुंबई

Jitendra Awhad: बहुत हार्ड! जितेंद्र आव्हाडांची मोठी घोषणा; 'त्या' रॅपरसाठी उठवणार आवाज

आव्हाडांचा ठाण्यात रॅप गाण्यांचा कार्यक्रम

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोठी घोषणा केली आहे. शिंदे-फडणवीस सरकारनं रॅपर राज मुंगासे याला नुकतीच अटक केली. यामुळं जितेंद्र आव्हाड संतापले असून सरकार लोकांची मुस्काटदाबी करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पण आता त्यांनी एक मोठी घोषणा केली असून रॅपरवर झालेल्या कारवाई विरोधात ते आवाज उठवणार आहेत. (Jitendra Awhad big announcement for Rapper who got arrested by Mumbai Police)

आव्हाडांनी ट्विट करत ही घोषणा केली असून आपण विद्रोह करणार असल्याचं म्हटलं आहे. यासाठी मी सगळ्या रॅपर्सना एकत्र करुन ठाण्यात कार्यक्रम घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आपल्या भाषेत व्यक्त होणं हे बाबासाहेबांनी दिलेलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. विद्रोह हा बुद्धापासून तुकारामांपर्येंत सगळ्यांनी केला आहे. यामध्ये शीव, शंभू, फुले, आंबेडकरांनीही विद्रोह केला आणि समाजाला दिशा दिली, असंही आव्हाडांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

रॅपरवर कारवाई का झाली?

महाराष्ट्रातील सत्तानाट्यावर आधारित एक रॅप गाणं राज मुंगासे या रॅपरनं तयार केलं होतं. या मराठी गाण्यामध्ये ५० खोके आणि चोर अशा शब्दांचा उल्लेख करण्यात आला होता. दरम्यान, सोशल मीडियावर हे गाणे व्हायरल झाल्यानंतर अंबरनाथमधील पोलीस ठाण्यात मुंगासेविरोधात गुन्हा दाखल झाला होता. यानंतर या तरुणाला पोलिसांनी अटकही केली आहे.

हे ही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency कर कक्षेत

रोहित पवार, अव्हाडांचा संताप

रॅपर मुंगासे याच्या अटकेनंतर राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी याबद्दल ट्वीट करत नाराजी व्यक्त केली होती. "आपल्या रॅप साँगमध्ये कुणाच्याही नावाचा उल्लेख नसताना राम मुंगासे या तरुण कलाकाराला ५० खोके या शब्दामुळं अटक होत असेल तर हा सरकारचा कबुलीजबाबच नाही का?" असा सवाल रोहित पवारांनी केला होता. तर आव्हाडांनी ट्विट करत "त्याचा गुन्हा काय? त्याने तर कोणाचं नाव देखील घेतलं नव्हतं. ५० खोके हे कोणाचं नाव आहे का? हे आधी पोलिसांनी स्पष्ट करावं. ५० खोके या वक्तव्यानं जातीय तणाव किंवा धार्मिक तणाव निर्माण कसा होतो? हे पोलिसांनी सिद्ध करावं, असं आव्हानही आव्हाडांनी दिलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT