Rain Update: 'या' भागात येत्या 3-4 तासांत पाऊस; कोल्हापूर, धुळे, छत्रपती संभाजीनगरात गारपीटीचा इशारा

हवामान खाताच्या इशाऱ्यामुळं शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
rain updates mumbai
rain updates mumbaiesakal
Updated on

मुंबई : राज्यातील बहुतांश भागात सध्या ढगाळ वातावरण असून दोन दिवसांसाठी हवामान खात्यानं यलो अलर्ट दिला आहे. यापार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये येत्या ३-४ तासांत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेष म्हणजे कोल्हापूर, धुळे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये गारपीटीचा इशाराही हवामान खात्यानं दिला आहे. (Rain in next 3 to 4 hours in Maharashtra hail warning in Kolhapur Dhule Chhatrapati Sambhajinagar)

येत्या तीन ते चार तासांत उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, नाशिक, औरंगाबाद यासंह पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये तसेच कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

rain updates mumbai
Treasure News: घराच्या खोदकामात सापडली ४०० किलो वजनाची तिजोरी! यात जे सापडलं त्यानंतर...

तर कोल्हापूर, धुळे आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये गारपीटीचा अंदाजही हवामान खात्यानं वर्तवला आहे.

हे ही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency कर कक्षेत

शेतकऱ्यांच्या चिंतेत भर

मात्र, यामुळं शेतकऱ्यांची चिंता वाढली असून आधीच गेल्या काही काळापासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळं शेतकऱ्याचं कंबरड मोडलं आहे. त्यात पुन्हा अवकाळी पावसाची स्थिती निर्माण झाल्यानं त्याच्या चिंतेत भर पडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com