jitendra awhad and Pratap Sarnaik
jitendra awhad and Pratap Sarnaik sakal
मुंबई

Pratap Sarnaik : आव्हाडांची इच्छा काय हे चांगले ओळखतो

सकाळ वृत्तसेवा

ठाणे - जितेंद्र आव्हाड यांनी दिलेल्या शुभेच्छा, मी उमेदवार म्हणून नाही तर, मित्र म्हणून स्वीकारतो. त्यांनी मला शुभेच्छा देण्यापेक्षा त्यांच्या उमेदवाराला शुभेच्छा दिल्या असत्या तर अधिक बरं झालं असत. आव्हाड यांची काय ईच्छा आहे हे मला अधिक माहिती असल्याचे मत शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले. तसेच जितेंद्र आव्हाड यांना पॉवर ऑफ ॲटर्नी दिली का मुख्यमंत्र्यांनी याची मला कल्पना नसल्याचा टोला देखील लगावला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहे. अशातच जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे लोकसभेचे महायुतीची उमेदवारी म्हणून प्रताप सरनाईक याना मिळावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर सरनाईक यांनी देखील त्याला उत्तर देत, मी त्यांचा लहानपणीचा मित्र आहे मला त्यांचा चांगला अनुभव असल्याचेही ते म्हणाले.

तसेच त्यांना मुख्यमंत्र्यांनी पॉवर ऑफ अटर्नि दिली आहे, का याची कल्पना नाही. तसेच ठाणे लोकसभा उमेदवार मुख्यमंत्री आणि महायुतीचे वरिष्ठ नेते ठरवतील असेही ते म्हणाले. सरकारे ने केलेल्या कामाच्या जोरावर आम्ही मतदारांपर्यंत मत मागण्यासाठी जातं आहोत.

आमचा उमेदवार जरी ठरत नसला तरी आमचा पक्ष महायुती आणि आमचा उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्याचा पुरुच्चार त्यांनी केला. संभाव्य उमेदवार म्हणुन यादी मोठी आहे जो उमेदवार असेल त्याला निवडून आणण्याची आमच्या सर्वांची जवाबदारी आहे. महायुतीचा उमेदवार येत्या गुडिपाडव्यापर्यंत जाहीर होईल अशी माझी खात्री आहे, गुढीपाडव्याला महायुतीच्या नावाने उमेदवार गुढी उभारणार असेही ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: AIच्या माध्यमातून भाजपाविरोधी अजेंडा राबवण्याचा झाला प्रयत्न! Open AI चा खळबळजनक दावा

ब्रेकिंग! ‘आरटीई’ प्रवेशाला मंगळवारपर्यंत मुदतवाढ; शिक्षण संचालकांचे आदेश; आता मुदतवाढ नसल्याचेही स्पष्टीकरण

Nagpur Temp : नागपूरमध्ये नोंद झालेलं 56 डिग्री तापमान होतं चुकीचं! हवामान विभागाला का द्यावं लागलं स्पष्टीकरण?

Congress Boycott Exit Polls: मतदानोत्तर चाचणीच्या चर्चांवर काँग्रेसचा बहिष्कार; काँग्रेसनं का घेतला असा निर्णय?

Exit Polls 2024: एक्झिट पोल्स महत्वाचे आहेत का? 'या' कारणांमुळं चुकू शकतो अंदाज

SCROLL FOR NEXT