Ajit Pawar Jitendra Awhad  esakal
मुंबई

Ajit Pawar: "पाच वर्षात शरद पवारांचं डोकं कोणी कोणी खाल्लं?"; आव्हाडांचा अजितदादा गटाला सवाल

२०१४ पर्यंत कोणी भाजपसोबत जाण्यासाठी का बोलत नव्हतं? याच उत्तरही त्यांनी दिलं.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : शरद पवारांचीच आधी इच्छा असल्यानं आज राष्ट्रवादी-भाजपसोबत जाण्याची प्रक्रिया घडली. या अजित पवारांच्या दाव्यावर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजितदादा गटातील नेत्यांबाबत काही सवाल उपस्थित केले आहेत.

भाजपसोबत जाण्यासाठी शरद पवारांचं डोकं कोण कोण खात होतं? त्याचबरोबर २०१४ पूर्वी असं कोण का बोलत नव्हतं? असे प्रश्न आव्हाडांनी उपस्थित केले आहेत. (Jitendra Awhad jibe at Ajit Pawar ncp group and raised some quetions about go with bjp)

आव्हाड म्हणाले, "तुमचं प्लॅनिंग कधीपासून होतं हे स्वतःच्या मनाला विचारा. पाच वर्षापासून शरद पवारांचं डोकं कोणी कोणी खाल्ल? हे जरा परमेश्वराला स्मरुन महाराष्ट्राला सांगा. कोण कोण माणसं आहेत जी शरद पवारांना सांगायची की चला भाजपत जाऊयात. अशा परिस्थितीत उद्विग्नावस्थेत आलेला माणूस शेवटी काय करतो? तो पटकन निर्णय घेऊन टाकतो" (Latest Marathi News)

पण मला हे माहिती आहे की, कोण कोण जायचं त्यांच्याकडं. उठले की भाजपत जायचं असंच होतं त्यांचं. २०१४ पर्यंत कोणी बोलत नाही कारण सत्तेत होते. शरद पवारांचा राजकीय प्रवास कायमचा धुळीस मिळवायचा. जो चेहरा महाराष्ट्रात पुरोगामित्वाचा त्यांनी तयार केला तो कायमचा संपवून टाकायचा पण आपण सत्तेत रहायचं हे आम्हाला नामंजूर होतं. (Marathi Tajya Batmya)

सत्ता ही आमच्यासाठी महत्वाची नाही. पण शेवटी काही विचार काही तत्व ही जपून ठेवलेली आहेत. पण तुम्हाला याचं काहीही घेणं देणं नव्हतं. बाकी सगळं गेलं खड्ड्यात फक्त सत्ता पाहिजे, अशा शब्दांत आव्हाडांनी अजित पवार गटावर सडकून टीका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : पिंपरी चिंचवड हादरले ! निगडीतील मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; मेट्रो कामगाराला पोलिसांनी घेतले ताब्यात

एका क्षणात सगळं बदललं ! मधू कांबीकरांच्या आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंग, स्टेजवर नाचल्या, अन्...!

सारा तेंडुलकरच्या बर्थडे पार्टीत तिला घट्ट मिठी मारणारा तो तरुण कोण? वहिनी सानिका पाहतच राहिली; Video Viral

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींचा ज्ञानेश कुमार यांना इशारा; म्हणाले, ‘तुमची झोप उडाली आहे, आम्ही तुम्हाला सोडणार नाही’

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवात नाही, तर कधी वाजणार? अंबाबाई मंदिर परिसरातील ‘म्युझिकल खांब’ बंदच; लाखो रुपये खर्च

SCROLL FOR NEXT