तुमच्याही बँक खात्यातून पैसे कापले गेलेत का?SBIसह अनेक बँकांचे ग्राहक चिंतेत, काय आहे कारण?

Bank Customers Alert: गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांकडून सोशल मीडियावर बँकेकडे तक्रारीही केल्या जात आहेत.
SBI, Canara Bank deducting money for govt insurance schemes from savings accounts without consent
SBI, Canara Bank deducting money for govt insurance schemes from savings accounts without consent Sakal

Bank Customers Alert: SBI आणि Canara सह अनेक बँकांच्या ग्राहकांनी तक्रार केली आहेत की, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा (PMJJY), प्रधानमंत्री सुरक्षा विमा (PMSBY) योजनेचे पैसे त्यांच्या परवानगीशिवाय खात्यातून कापले गेले आहेत. या संदर्भात गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांकडून सोशल मीडियावर बँकेकडे तक्रारीही केल्या जात आहेत.

मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात प्रधानमंत्री जीवन ज्योती आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सुरू केली होती. या दोन्ही योजनांमध्ये वार्षिक प्रीमियम ग्राहकांच्या बँक खात्यातून भरला जातो. या योजनेत राहण्यासाठी दरवर्षी प्रीमियम भरून त्याचे नूतनीकरण करावे लागते. मात्र नियमानुसार यासाठी ग्राहकांची परवानगी घेणे आवश्यक आहे.

SBI, Canara Bank deducting money for govt insurance schemes from savings accounts without consent
RS 2000 Note: दोन हजार रुपयांच्या नोटा अजूनही कायदेशीर; 97 टक्क्यांहून अधिक नोटा बँकांमध्ये आल्या परत

SBI खातेधारक सिबानंद पांडा यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, बँकेने त्यांच्या संमतीशिवाय PMJJBY विमा योजनेसाठी खात्यातून रक्कम कापली आहे. या योजनेसाठी मी अर्ज केला नसल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे, आणखी एक SBI ग्राहक, प्रणव महतो यांनी सांगितले की, त्यांचे बचत खाते त्यांच्या परवानगीशिवाय PMJJBY मध्ये नोंदणी केले गेले आहे.

SBI, Canara Bank deducting money for govt insurance schemes from savings accounts without consent
RBI Action: रिझर्व्ह बँकेने HDFC, BOAला ठोठावला दंड; सहकारी बँकांवरही केली कारवाई, काय आहे प्रकरण?

ग्राहकांच्या तक्रारींबाबत कॅनरा बँकेशी संपर्क साधला तेव्हा बँकेने सांगितले की, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनाच्या अंतर्गत ग्राहकांच्या खात्यातून पैसे वजा होत आहेत याच्या काही तक्रारी बँकेकडे आल्या आहेत. या प्रकरणाची दखल घेण्यात आली आहे, ग्राहकांच्या चिंता दूर करण्यासाठी बँक काम करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com