jitendra awhad sakal media
मुंबई

'कोणी केलं असेल तर...', लाल महालातील लावणीवरून आव्हाड संतापले

सकाळ डिजिटल टीम

पुण्यातील लाल महालात तमाशातील गाण्यांवर लहान मुलींचे नृत्य आयोजन केल्याचं समोर आलं. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लाल महालाची बदनाम केली जात असल्याच्या प्रतिक्रिया आल्या. ही बदनामी करणाऱ्यांवर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे विकास पासलकर यांनी केली आहे. त्यानंतर आता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त करत ट्वीट केलंय. (Jitendra Awhad News)

महापालिकेने उन्हाळ्याच्या सुटीत लाल महाल बंद ठेवला आहे. पुणे शहरात हजारो पर्यटक जिजाऊ व शिवरायांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येतात. मात्र पालिका व तेथील सुरक्षा रक्षकांकडून लाल महाल बंद ठेवण्यात आलेला आहे. (Lal Mahal Lavani Controversy)

मात्र, रिल्स करण्याच्या नादात लावणीवर नाचगाणी सुरू असल्याचा आरोप पासलकर यांनी केला आहे.

या व्हिडिओसंदर्भात तीन दिवसापूर्वी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे संभाजी ब्रिगेडच्यावतीने तक्रार करण्यात आलेली आहे.

या घटनेच्या पाठीमागे खूप मोठे षडयंत्र आहे. हे षडयंत्र रचणारे व त्यांना साथ देणारे कोण आहेत, याचा शोध घेतला पाहिजे. या घटनेचा शुक्रवारी (ता.२०) लाल महालात जाऊन निषेध करण्यात आला. यावेळी जिजाऊ व शिवरायांना पुष्पहार अर्पण करून निषेध नोंदवण्यात आल्याची माहिती संभाजी ब्रिगेडने दिली.

आता संभाजी ब्रिगेडनंतर जितेंद्र आव्हाड यांनीही संताप व्यक्त केलाय. त्यांनी ट्वीट करत पुन्हा या गोष्टी टाळण्याचं आवाहन केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kedgaon Crime : केडगावातील गर्भलिंग निदान रॅकेटची व्याप्ती मोठी; दोघेजण अद्याप फरार, आणखी काहींचा सहभाग असण्याची शक्यता

Abdul Sattar: अब्दुल सत्तारांची नाराजी दूर, मुलाचा उमेदवारी अर्ज उद्या माघारी घेणार

Donald Trump: मोज्तबा खामेनेई यांची भेट घेण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा; नेतन्याहू यांच्याशी वादावादीनंतर ट्रम्प यांचा भलताच प्लॅन

Pune Toxic Liquor Case: विषारी दारूसाठी रसायन पुरविणाऱ्या पिता-पुत्राला नवी मुंबईतून अटक; तपासासाठी दहा पथके

Lowest Price Electric Scooter : 50 हजारपेक्षा कमी किंमतीत इलेक्ट्रिक स्कूटर; सगळ्यात स्वस्त आहेत 'या' 3 गाड्या, दमदार रेंज

SCROLL FOR NEXT