मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्यासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न | Jitendra Awhad | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jitendra Awhad

मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्यासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

मुंबई : आज मंत्रालयासमोरच धक्कादायक घटना घडली आहे. राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या शासकीय बंगल्यासमोर एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत महिलेला रोखल्याने पुढील अनर्थ टळला आहे. मंत्रालयासमोर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचा शिवगड हा शासकीय बंगला आहे. आज रात्री एक महिला आव्हाड यांच्या शिवगड बंगल्यासमोर आली व तिने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. (Woman Attempted Suicide Before Minister Jitendra Awhad In Mumbai)

हा प्रकार तैनात असलेल्या पोलिसांच्या निदर्शनास आला. त्यांनी धाव घेऊन महिलेच्या हातातील पेट्रोलची बाटली काढून घेतली. ही महिला बीडीडी चाळमधील रहिवासी असल्याचे सांगितले जात असून तिला मरीन लाईन्स पोलिसांनी ताब्यात घेतल आहे.

महिलेने असे कृत्य का केले याचा शोध पोलिस घेत आहेत. सदरील महिलेचे तृप्ती कांबळे असे नाव असल्याचे सांगितले जात आहे.