वसई ः रस्त्यावर खो-खो खेळताना मुले. 
मुंबई

मोबाईल ठेवून मुले पळाली रस्त्यांवर...

सकाळ वृत्तसेवा

वसई ः मोबाईल, नेटच्या गराड्यात अडकून पडलेल्या मुलांना खेळाकडे वळवण्यासाठी वसईत झालेल्या फन स्ट्रीटमध्ये उत्साहाने सहभागी होत मुलांनी खेळांचा मनमुराद आनंद लुटला. 

सध्या मैदानी खेळांकडे कल कमी होत असल्यामुळे वसई-विरार महापालिका प्रभाग समिती आय, जागृत नागरिक संस्थेतर्फे हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. याचे उद्‌घाटन महापौर प्रवीण शेट्टी यांच्या हस्ते झाले.

दत्तानी मॉल ते बाभोळा पोलिस चौकीमधील रस्त्यावर सायकलिंग, लगोरी, दोरी उड्या, चित्रकला, लांब उडी, चेंडू फेक, योगा, स्केटिंग, लेझीम, संगीत यासह विविध प्रकारच्या खेळांत मुलांनी प्रावीण्य दाखवले. या वेळी ज्येष्ठ नागरिक, तरुणदेखील सहभागी झाले होते.

महापौर प्रवीण शेट्टी, उपमहापौर प्रकाश रॉड्रिग्ज, स्थायी समितीचे सभापती प्रशांत राऊत, परिवहन समितीचे माजी सभापती भरत गुप्ता, नगरसेवक मनीष वर्तक, ज्योती धोंडेकर, उमजा पिरखान, लॉरेल डायस, अलका गमज्या, वसई तालुका कला क्रीडा मंडळाचे सचिव प्रकाश वनमाळी, सहायक आयुक्त मेघा वर्तक, जागरुक नागरिक संस्थेचे अध्यक्ष चिन्मय गव्हाणकर यांच्यासह मान्यवर या वेळी उपस्थित होते. 

महापौरही रमले खेळात 
वसई-विरार महापालिकेचे महापौर प्रवीण शेट्टी यांनादेखील फॅन स्ट्रीट खेळाचा मोह आवरला नाही. त्यांनी लगोरीसह अन्य खेळांचा आनंद लुटत लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला. आपले आरोग्य उत्तम राहावे यासाठी मुलांनी मैदानी खेळात सहभाग घेतला पाहिजे. शारीरिक आणि मानसिकरीत्या आपण सुदृढ राहतो. मोबाईल आणि नेटच्या गराड्यातून मुलांनी बाहेर येण्यासाठी पालकांनी लक्ष घालावे, असेही शेट्टी यांनी या वेळी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT