रेल्वे परिसरात पतंग उडवाल तर...

If you fly a kite in the train area ...
If you fly a kite in the train area ...


मुंबईः पश्चिम रेल्वे प्रशासन रेल्वे परिसरात पतंग उडवणाऱ्यांवर कारवाई करणार आहे. पतंगाच्या मांजामुळे रेल्वेच्या ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार अनेक वेळा घडले आहेत. त्यामुळे अशा पतंगबाजांना रोखण्यासाठी कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले आहे.

विजेचा मोठा धक्का लागण्याची शक्यता

उपनगरी रेल्वेच्या ओव्हरहेड वायरमधून तब्बल २५ हजार व्होल्ट क्षमतेचा वीजप्रवाह वाहत असतो. इतक्या प्रचंड क्षमतेच्या वीजवाहिन्यांच्या स्पर्शानेच नव्हे, तर केवळ संपर्कात आल्यानेही विजेचा मोठा धक्का लागण्याची शक्यता असते. ओव्हरहेड वायरपासून पाऊण मीटर अंतरावर आलेल्या पतंगातूनही वीजप्रवाह वाहून जबर धक्का बसू शकतो.

सात वर्षांचा मुलगा विजेचा धक्का बसून जखमी

काही वर्षांपूर्वी बोरिवली येथे सात वर्षांचा मुलगा पतंग उडवताना विजेचा धक्का बसून जखमी झाला होता. विजेच्या तारांमध्ये अडकलेल्या मांजा व पतंग काढण्याच्या धडपडीतून अनेक वेळा दुर्घटना होण्याची शक्यता असते. रेल्वेस्थानकालगत असणाऱ्या झोपडपट्ट्यांमध्ये असे प्रकार सर्रास आढळतात. पश्चिम रेल्वेवर माहीम, वांद्रे, कांदिवली व बोरिवली परिसरात मोठ्या प्रमाणात पतंगबाजी चालते.

पश्चिम रेल्वेच्या परिसरात पतंग उडवताना दिसलेल्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल. प्रत्येक विभागात आरपीएफचे जवान तैनात असतील. त्यामुळे नागरिकांनी रेल्वे परिसरात पतंगबाजी करू नये. - एस. आर. गांधी, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, पश्चिम रेल्वे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com