Mumbai Loksabha News
Mumbai Loksabha News sakal
मुंबई

Loksabha News: मुंबईतील मतदार संघात आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात; जाणून घ्या शेवटची तारीख

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील  मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम,  मुंबई उत्तर पूर्व,  मुंबई उत्तर मध्य या चार मतदारसंघात शुक्रवार २६ एप्रिल पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होईल.

त्यासाठीची तयारी संबंधित चारही लोकसभा मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हा निवडणूक यंत्रणेने केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीची अधिसूचना  मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य या चार मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातील सूचना फलक, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय येथील सूचना फलकावरही प्रदर्शित करण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक यंत्रणेने दिली आहे.

लोकसभेच्या या निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात २० मे २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास २६ एप्रिल २०२४ पासून सुरवात होईल. ३ मे २०२४ पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येतील.

४ मे २०२४ रोजी दाखल उमेदवारी अर्जांची छाननी होईल. त्यानंतर ६ मे २०२४ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत असेल.  २० मे २०२४ रोजी मतदान होईल. ४ जून २०२४ रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

Pune Traffic News: गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत एक जूनपासून बदल, वाचा महत्वाची बातमी

Railway News: नागरिकांच्या प्रवासावर ब्लॉक नको; मेगा ब्लॉकवर मनसे आमदार राजू पाटील यांचे ट्विट

SCROLL FOR NEXT