मुंबई

मुंबईत हरवलेला मोबाईल थेट १७ महिन्यांनंतर सापडला कर्नाटकमध्ये

निलेश मोरे

मुंबई:  माटुंगामधील रुईया कॉलेजमध्ये अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या धनश्री ध्येर्यशील शितोळे या विद्यार्थिनीचा सप्टेंबर 2019 मध्ये  मोबाईल चोरीला गेला होता.  धनश्री ही विद्यार्थिनी घाटकोपर असल्फा येथे राहत असून माटुंगा येथील रुईया कॉलेज मध्ये अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे. 

सप्टेंबर 2019 मध्ये धनश्री रुईया कॉलेज सुटल्या नंतर दादर रेल्वे स्थानकात मैत्रिणीच्या आईची बाहेर गावाची तिकीट बुकिंसाठी गेली असता त्या दरम्यान दादर जिना चढत असताना गर्दीत मोबाईल लंपास केल्याचे तिच्या लक्षात आले. मोबाईल चोरी झाल्याबाबत तिने दादर रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल केली. 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम ए इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली दिनेश चव्हाण , मनोज भगत , अनिलकुमार खाडे , संतोष जाधव , दीपक साळवे यांनी या चोरी बाबत अधिक तपास केला. 17 महिन्यानंतर रेल्वे पोलिसांना कर्नाटकमध्ये चोराचा सुगावा लागला. कर्नाटक येथून सफीउल्ला नसरउल्ला शेख ( 57 ) या आरोपीस पोलिसांनी बेड्या ठोकून त्यास अटक केले आहे. त्याच्यावर कलम 379 , 411 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

दरम्यान 8 फेब्रुवारी 2021 रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम ए इनामदार यांनी रेड मी वाय 2 हा चोरीस गेलेला मोबाईल धनश्रीला तिच्या स्वाधीन  करण्यात आला.

---------------------

(संपादन- पूजा विचारे)

lost mobile phone was found in Mumbai after 17 months in Karnataka

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT