मुंबई

चैत्यभूमीला पोलिसांचा पहारा, शिवाजीपार्क पहिल्यांदाच मोकळे

तेजस वाघमारे

मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनावरही यंदा कोरोनाचे सावट पहाण्यास मिळत आहे. चैत्यभूमी परिसरात अनुयायांनी गर्दी करू नये यासाठी पोलिसांनी शिवाजी पार्क, चैत्यभूमी परिसरात चोख बंदोबस्त ठेवला आहे. यामुळे यंदा डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चैत्यभूमी परिसर अनुयायांशिवाय सुनासूना दिसत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र दुसरी लाट येण्याच्या शक्यतेने राज्य सरकारने अद्यापही काही निर्बंध कायम ठेवले आहेत. दरवर्षी महामानवाला अभिवादन करण्यासाठी देशभरातून अनुयायी चैत्यभूमीवर 1 डिसेंबरपासूनच दाखल होत असतात. मात्र यंदा कोरोनामुळे अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी गर्दी करू नये, असे आवाहन राज्य सरकार, महापालिका आणि आंबेडकरी संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा राज्यभरातून अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झालेले नाहीत.

दरवर्षी भीम अनुयायांच्या गर्दीने फुलून जाणाऱ्या रस्त्यांवर यंदा शुकशुकाट आहे. शिवाजी पार्क मैदानात महापालिकेकडून अनुयायांसाठी विविध सुविधा पुरविण्यात येतात. मात्र यंदा कोणतीही सुविधा पुरविण्यात आलेली नाही. अनुयायांअभावी यंदा शिवाजी पार्क मैदानही रिकामेच दिसत आहे. दरवर्षी पुस्तके, विविध साहित्य विक्रीसाठी येणारे विक्रेतेही यंदा आलेले नाहीत. यामुळे मैदान मोकळे असून नेहमीप्रमाणे मैदान खेळासाठी खुले असल्याने विविध खेळ सुरू आहेत. त्याचप्रमाणे व्यायाम करण्यासाठी आणि फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी वर्दळ येथे पहाण्यास मिळत आहे.

मैदानात कोणी राहू नये, यासाठी शिवाजी पार्कमध्ये पोलिस तैनात करण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणात पोलिस असल्याने या परिसराला पोलिस छावणीचे रूप आले आहे. तसेच दरवर्षीप्रमाणे विविध नेत्यांनी बाबासाहेबांना अभिवादन पर बॅनर या परिसरात लावले आहेत. दरवर्षी शिवाजीपार्क मैदानात येणारी लाखोंची गर्दी यंदा गायब आहे.

---------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mahaparinirvana Day 6th December Police Security At shivaji park dadar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi on Paper Leak: 'पेपरफुटी करणाऱ्यांची आता खैर नाही'; PM मोदींची मोठी घोषणा, कठोर कायदा आणणार; व्हिडिओ संदेशात नेमकं काय सांगितलं?

Government talks CJP : सोनम वांगचुकनी उपोषण सोडल्यानंतर मोठी घडामोड! कॉकरोच जनता पार्टीसोबत सरकार चर्चेला तयार, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय होणार?

Latest Marathi News Live Update : केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्याशी चर्चेनंतर २६ दिवसांनी सोनम वांगचुक यांनी सोडलं उपोषण

Spinach Cheese Sweet Corn Mini Paratha: मुलांच्या डब्यासाठी बेस्ट! पालक-चीज-स्वीट कॉर्नचे मिनी पराठे एकदा नक्की ट्राय करा

सोनम वांगचुक यांनी 26 दिवसांनी उपोषण सोडलं, दिल्लीत मध्यरात्री घडामोडी; जेपी नड्डांनी रुग्णालयात भेट घेतल्यानंतर निर्णय

SCROLL FOR NEXT