येत्या तीन महिन्यात कोविड लसीचे साठवणूक केंद्र तयार होणार

येत्या तीन महिन्यात कोविड लसीचे साठवणूक केंद्र तयार होणार

मुंबईः  मार्च महिन्यांपर्यंत कोविड लसीचे साठवणूक केंद्र तयार होणार आहे. मुंबईतील लोकसंख्येचा विचार करुन एका वेळाला एक कोटी 20 लाख लसींची साठवण करता येईल अशा क्षमतेचे केंद्र कांजूरमार्ग येथे तयार करण्यात येत आहे. लसीच्या उपलब्धेनुसार टप्प्याटप्प्याने मुंबईतील नागरिकांनाही ही लस देण्याचा पालिकेचा विचार आहे.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी या केंद्राची पाहाणी केली आहे. लसींची साठवणूक करण्यासाठी 2 ते 8 अंशात करायची असल्याने त्यासाठी कोल्डस्टोरेज तयार करण्यात येणार आहे. या कोल्डस्टोरेजच्या निवीदा प्रक्रियेचा मसुदा पुढील आठवड्यापर्यंत तयार करण्याचा प्रयत्न महापालिका करत आहे. जानेवारी सुरुवातीपासूनच कोल्ड स्टोरेजच्या कामाला सुरुवात होईल. फेब्रुवारी मार्च महिन्यापर्यंत कोल्डस्टेरज पूर्ण तयार होईल. त्यानंतर कधीही लस आल्या तरी त्याची साठवण करण्यास पालिका तयार असेल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

मुंबईची लोकसंख्या विचारता घेता 1 कोटी 20 लाख लसीची साठवण क्षमता तयार करण्यात येणार आहे. ज्या प्रकारे लस उपलब्ध होतील त्यानुसार लस देण्याचा आराखडा तयार करण्यात येईल. मात्र सुरुवात कोविड वॉरियरपासून करण्यात येईल असेही महापौरांनी नमूद केले.

 
भारतीय बनावटीची लस

पालिका भारतीय बनावटीची लस वापरणार आहे. भारत बायोटेक आणि सिरम इंन्स्टिट्यूटमध्ये तयार झालेली लस वापरण्यात येणार आहे. या लस 2 ते 8 अंश तापमानात साठवणे आवश्‍यक आहे. तसेच काही लसी उणे तापमानात साठवाव्या लागतात. तशी सोयही करण्यात येणार आहे. 2 ते 8 अंश सेल्सिअस तापमान राहिल अशी दोन वॉक इन कुलर उपकरणे बसवण्यात येणार आहे. त्यांची क्षमता प्रत्येकी 40 घन मीटर एवढी असेल.  उणे 15 ते 25 तापमान राखता येईल असे एक 20 घनमीटरचे मशिनही वापरण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेच्या लसीकरण मोहिमेच्या प्रमुखासह आरोग्य अधिकारी डॉ.शिला जगताप यांनी दिली.

 सूर्याची किरणंही पडणार

ही लस फारकाळ सूर्यप्रकाशात राहिल्यास परिणामकारकता कमी होऊ शकते. त्यामुळे त्याची वाहतूक करतानाही ही काळजी घेण्यात येणार आहे. लस साठवणूक केंद्र हे कांजूरमार्ग येथील आरोग्य विभागाच्या इमारतीच्या पहिल्या ते तिसऱ्या मजल्यापर्यंत करण्यात येणार आहे. मात्र या इमारतीच्या पहिल्या मजल्यापर्यंत वाहन येण्याची सोय आहे. तिथपर्यंत लसी घेऊन येणारी गाडी येईल. तसेच हे केंद्र वर्दळीपासून एका बाजूला असलेल्या इमारतीत करण्यात आल्या आहे.

लस साठवणुकीचे मुख्य केंद्र कांजूरमार्गला तयार करण्यात येणार आहे. तसेच परळ येथे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यालयात लस साठवून ठेवण्यासाठी उपकेंद्रपूर्वी पासूनच तयार आहे. पश्‍चिम उपनगरातही अशाच प्रकारचे उपकेंद्र तयार करण्यात येणार आहे.

------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai Covid vaccine storage center ready Upcoming three months

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com