lockdown
lockdown  e sakal
मुंबई

लॉकडाउन कधी उठवणार? राज्याच्या मंत्र्याने दिलं स्पष्ट उत्तर

विराज भागवत

Maharashtra Lockdown मुळे नोकरदार वर्ग, छोटे-मोठे व्यावसायिक त्रस्त असल्याचं चित्र

मुंबई: राज्यातील कोरोना रूग्णावाढ (Coronavirus) आता हळूहळू आटोक्यात येऊ लागली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्याचा रिकव्हरी रेट (Recovery Rate) हा ९३ टक्क्यांच्या आसपास पोहोचलाय. अशा परिस्थितीत राज्यातील लॉकडाउन (Maharashtra Lockdown) कधी उठवला जाणार (Revoke) आणि लोक पुन्हा सर्वसामान्यांसारखं जीवन कधी जगणार? असा सवाल (Question) सर्व स्तरातून विचारला जातोय. या प्रश्नाचं उत्तर राज्याचे मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री असलम शेख (Aslam Shaikh) यांनी दिलं आहे. "राज्यात लसीकरण (Vaccination) मोहिमेने जोर धरला आहे. लसीकरणात आपल्या राज्याचा पहिला क्रमांक लागतो. जर राज्यातील किमान 50 टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले तरच लॉकडाउन उठू शकतो", असं वक्तव्य असलम शेख यांनी केलं आहे. (Maharashtra Lockdown will be revoked when 50 percent of people get vaccinated)

"लॉकडाऊन अचानक उठवला जाणं शक्य नाही. पण सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचा सरकारचा नक्कीच विचार आहे. कॅबिनेटच्या बैठकीत याबद्दल चर्चा होणार असून लवकरच याबद्दलचा निर्णय घेण्यात येईल. हॉटेल्स, हेअर कटिंग सलून, इलेक्ट्रिक सामान विकणारी दुकानं अशा छोट्या उद्योगांना दिलासा देण्याचा निर्णय राज्याची कोविड टास्क फोर्स आणि राज्याचे मुख्यमंत्री घेतील, असं आम्हाला वाटतंय. पण एक मात्र नक्की की जोपर्यंत मुंबई आणि महाराष्ट्रात 50 टक्के लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत लॉकडाऊन उठवला जाणार नाही", असं त्यांनी स्पष्ट केलं.

आता रूग्णसंख्या आटोक्यात येऊ लागली आहे. अशा वेळी जर लॉकडाउन उठवला तर ते कोरोनाला आमंत्रण देण्यासारखंच ठरेल. त्यामुळे सध्या लॉकडाऊनमध्ये कसा दिलासा देता येईल? काय नियम असतील? कोणत्या दुकानांना परवानगी देता येईल? या सर्व गोष्टींचा विचार सुरु आहे. राज्याची कोविड टास्क फोर्स याबद्दल सूचना करेल आणि त्यादृष्टीने निर्णय घेतले जातील", असेही शेख यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद; पॉवर शेअर्स बनले 'सुपरस्टार'

IPL 2024: केकेआरचा स्टार खेळाडू आता बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री; स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंडनं दिली संधी

Crime News : बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी 22 डीजे वर कारवाई; 6 लाख 32 हजार दंड, व गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

SCROLL FOR NEXT