esakal | P305 बार्ज दुर्घटना: मृतदेह तर सापडले पण आता नवा पेच
sakal

बोलून बातमी शोधा

Barge-P305

P305 बार्ज दुर्घटना: मृतदेह तर सापडले पण आता नवा पेच

sakal_logo
By
दिनेश चिलप मराठे

मुंबादेवी: तौक्ते चक्रीवादळा (Cyclone Tauktae) दरम्यान अरबी समुद्रात (Arabian Sea) बार्ज P305 आणि टग बोट बुडून झालेल्या अपघातात 31 मृतदेहांची (Dead Bodies) ओळख अजून पटलेली नाही. नौदलाने (Navy) आतापर्यंत 86 कर्मचाऱ्यांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. नौदलाने बार्जवरच्या 274 कर्मचार्‍यांपैकी 188 जणांना सुखरुप (Rescued) बाहेर काढले. चार-पाच दिवस हे मृतदेह समुद्राच्या खारट पाण्यात (Salt Water) राहिल्याने मृतदेहांची ओळख (Identity) पटणे कठिण झाले आहे. त्यामुळे आता DNA चाचणीच्या मदतीने या मृतदेहांना ओळखण्याचे काम सुरु असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. (31 Dead Bodies found on P305 Barge are hard to identify because of Oceans Salt Water)

हेही वाचा: SSC EXAM: दोन दिवसात जाहीर होणार निर्णय

या दुर्घटनेत बेपत्ता असलेल्यांच्या कुटुंबियांना DNA चाचणीसाठी बोलावण्यात आले आहे. या चाचणीमुळे मृतदेह ओळखण्यास मदत होईल, असे एका मृत कर्मचाऱ्याच्या नातेवाईकाने 'सकाळ'शी बोलतांना सांगितले. बेपत्ता झालेल्या व्यक्तीच्या मुलाचे तसेच अन्य सदस्यांचे रक्ताचे नमुने घेतले आहेत. आतापर्यंत 51 मृतदेहाची ओळख पटली आहे. या घटनेत गुजरात आणि रायगड किनारपट्टीकडे शव वाहून गेले होते. त्यापैकी रायगड समुद्रकिनाऱ्यावरील 8 मृतदेहांचे शवविच्छेदन केल्यानंतर त्यांना जे जे रुग्णालयात आणले आहे. तर गुजरात किनाऱ्याकडे वाहून गेलेले मृतदेह रुग्णालयात आणण्यात येत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

हेही वाचा: आरे CEO च्या घरात कचऱ्यात सापडले ३.५ कोटी रुपये

दरम्यान, ओळख पटल्यावर हे मृतदेह पंजाब, केरळ, उत्तर प्रदेश बिहार, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश या राज्यात पाठवण्यात येणार आहेत. राज्य सरकारने हे मृतदेह हवाई एम्बुलेन्सद्वारे नेण्याची सोय करावी, अशी मागणी प्रदेश कॉंग्रेस सचिव जोजो थॉमस यांनी केली आहे. गेल्या चार दिवसांपासून ते जे.जे रुग्णालयात मृतांच्या नातेवाईकांना मदत करण्याचे काम करत आहेत.

(संपादन- विराज भागवत)