SUICiDE sakal media
मुंबई

मालाडमध्ये इस्टेट एजंटची गळफास घेऊन आत्महत्या; तिघांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

अंधेरी : मालाड (malad) येथे एका इस्टेट एजंटने (Estate Agent) आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केल्याची घटना घडली. इसराल जलील खान असे त्याचे नाव असून, त्याच्या घरी पोलिसांना तीन पानी चिठ्ठी (suicide note) सापडली आहे. आर्थिक वादातून आलेल्या नैराश्यातून (financial depression) त्याने आत्महत्या केल्याचे बोलले जाते. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी (malwani police) तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल (FIR) केला आहे.

इसराल हा मालाडच्या मालवणी परिसरात राहत होता. तिथेच तो इस्टेट एजंटचे काम करीत होता. काही दिवसांपूर्वी त्याने एका रूमचा खरेदी-विक्रीचा व्यवहार केला होता. त्यात त्याला १९ लाख रुपये मिळाले होते. ही रक्कम त्याने काही ठिकाणी गुंतविली होती. याच दरम्यान रूमचा हा व्यवहार रद्द झाला आणि संबंधित व्यक्तीने त्याच्याकडे पैशांसाठी तगादा लावला होता. त्यानंतर त्याने दहा लाख रुपये देऊन उर्वरित रक्कम लवकर देण्याचे मान्य केले होते; मात्र त्याला ही रक्कम परत येत नव्हती.

याच कारणावरून त्यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू होता. त्यातून आलेल्या नैराश्यातून इसराल याने शुक्रवारी रात्री उशिरा त्याच्या राहत्या इमारतीच्या टेरेसमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार नंतर स्थानिकांकडून समजताच मालवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्याला पोलिसांनी तातडीने कांदिवलीच्या भगवती रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनास्थळी पोलिसांना एक चिठ्ठी सापडली असून, त्यात त्याने तिघांची नावे नमूद केली आहेत. तिघांविरुद्ध शनिवारी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT