esakal | Mumbai: अनैतिक संबंधाच्या संशयातून प्रियकराची हत्या
sakal

बोलून बातमी शोधा

हत्या
मुंबई : अनैतिक संबंधाच्या संशयातून प्रियकराची हत्या

मुंबई : अनैतिक संबंधाच्या संशयातून प्रियकराची हत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : दहा दिवसांपूर्वी ऍण्टॉप हिल येथे सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयाजवळ सापडलेल्या मुंडके नसलेल्या अज्ञात व्यक्तीच्या हत्येचा पर्दाफाश करण्यात अखेर गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांना यश आले आहे. मृत व्यक्तीचे नाव दादा जगदाळे असे या ४५ वर्षांच्या व्यक्तीचे नाव आहे. याच गुन्ह्यांत एसीपी कार्यालयात पोलीस नाईक म्हणून काम करणार्‍या शिवशंकर गायकवाड व त्याची पत्नी मोनाली गायकवाड या दोघांना गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली आहे.

अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने १४ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दादा आणि मोनाली यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा शिवशंकर यांना संशय होता. त्यातून हा त्याने त्याची हत्या करुन हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. ३० सप्टेंबरला ऍण्टॉप हिल येथील सीजीएस कॉलनी, सेक्टर सात, इमारत क्रमांक ९८ जवळील एसीपी कार्यालयात पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला होता.

हेही वाचा: मुंबईच्या धर्तीवर राज्यातही इलेक्ट्रीक बस

त्याचे हातपाय तोडलेले, मुंडके नसलेले, अर्धवट जळालेल्या स्थितीत सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी संतोष आनंदाराव जाधव यांच्या तक्रारीवरुन ऍण्टॉप हिल पोलिसांनी अज्ञात मारेकर्‍याविरुद्ध हत्येसह हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यांचा ऍण्टॉप हिल पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी तपास करीत होते. मृतदेहाच्या हातावर दादा हे नाव गोंदलेले होते. हाच धागा पकडून पोलिसांनी मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते.

याच दरम्यान त्याची ओळख पटविण्यात आली. तपासात तो दादा जगदाळे तसेच तो मूळचा सोलापूरचा रहिवाशी असल्याचे उघडकीस आले होते. त्याच्या कॉल रेकॉर्डवरील तो शिवशंकर आणि मोनाली यांच्या संपर्कात होता. शिवशंकर हा मुंबई पोलीस दलात पोलीस नाईक म्हणून कार्यरत असून सध्या त्याची पोस्टिंग ऍण्टॉप हिल विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्ताकडे होती. तिथेच तो चालक म्हणून कामाला होता. शिवशंकर हा वरळी येथे त्याची पत्नी मोनालीसोबत राहत होता. तो त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला नेहमी मारहाण करीत होता. पतीकडून होणार्‍या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून ती तिच्या माहेरी निघून गेली होती. गेल्या दिड वर्षांपासून ती तिच्या माहेरी राहत होती.

हेही वाचा: मुंबई : महाराष्ट्र बंदला डबेवाल्यांचा पाठिंबा

अलीकडेच ती तिच्या घरी आली होती. मात्र घरी आल्यानंतरही शिवशंकर हा तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. तिचे कुठल्या पुरुषाशी अनैतिक संबंध आहे असे त्याला वाटत होते. याच दरम्यान त्याने तिचे दादासोबतचे काही मॅसेज वाचले होते. या मॅसेजनंतर तो प्रचंड संतापला होता. त्यातूनच त्याने दादाच्या हत्येची योजना बनविली होती. त्याने त्याला फोन करुन मुंबईला बोलावून घेतले. मुंबईत आल्यानंतर त्याची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे केले. मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून त्याने त्याचे अवयव एका गोणीत भरले.

हा प्रकार नंतर त्याच्या पत्नीला समजताच ती प्रचंड घाबरली. त्याच्या सांगण्यावरुन तिने हत्येचा पुरावा नष्ट करण्यास त्याला मदत केली होती. घटनास्थळी गोणी आणल्यानंतर त्याने पेट्रोल टाकून हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. कोणालाही संशय येऊ नये म्हणून तो नियमित कामावर येत होता. त्याचे मुंडके गोणीत नव्हते, ते मुंडके त्याने कुठे टाकले याचा आता पोलीस तपास करीत आहेत. मोबाईल रेकॉर्डवरील हा हत्येचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. तपासात शिवशंकर आणि मोनालीचा सहभाग उघडकीस येताच त्यांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर रविवारी दुपारी त्यांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

loading image
go to top