Mumbai-Local-Train sakal
मुंबई

Crime News: रेल्वेमध्ये सहप्रवाशाला जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्याला अटक; तपासात उघड झाले आरोपीचे कारनामे

आरती मुळीक-परब

दिवाः दिवा-मुंब्रा दरम्यान धावत्या रेल्वेत सहप्रवाशाला जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या नशेखोर गर्दूल्याला रेल्वे पोलिसांनी मोठ्या शिताफिने ताब्यात घेतले आहे. धावत्या रेल्वेत दिव्यातील एका मूकबधीर व्यक्तीला गर्दुल्याने जाळण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना शनिवार रात्री घडली होती.

या घटनेनंतर काही वेळातच ठाणे रेल्वे पोलिसांकडे हा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी हा हल्लेखोराचं शोधकार्य सुरु केले. त्यानंतर रविवारी संध्याकाळपर्यंत ह्या आरोपीला भिवंडीतून ताब्यात घेतले. हा नशेखोर गर्दुल्ला अल्पवयीन असल्याने त्याची कोणतीही माहिती रेल्वे पोलिसांनी दिली नाही.

हेही वाचाः नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

सदरील गर्दुल्ल्यावर मोबाईल चोरीच्या 4 केसेस आहेत. एक दादर, एक बोरीवली तर दोन ठाण्यात मोबाईल चोरीच्या केसेसमध्ये त्याला अटक झाली होती. हा आरोपी नशेसाठी चोरी करतो असे रेल्वे पोलिसांचे म्हणणे आहे. तो नशेखोर गर्दुल्ला अल्पवयीन असल्याने त्याला आज भिवंडीतील बालन्यायालयात हजर केले होते. या गुन्ह्यातील पुढील चौकशीसाठी न्यायालायाने पोलिसांना त्याचा ताबा दिलेला आहे.

याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरी कांदे यांनी सांगितलं की, शनिवारी रात्रीच ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपी असलेला विकलांग गर्दुल्लाच्या शोधासाठी लोहमार्ग पोलिसांची दोन पथके कार्यरत झाली होती. सदर पथकांनी ही रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी नशेखोर गर्दुल्ल्याला मोठ्या शिताफिने भिंवडीतून पकडले. तसेच आजपासून रात्री नऊ नंतर ठाण्याच्या फलाटावर पोलिस तैनात करुन दिव्यांग डब्बा तपासला जाईल.

प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
रेल्वेच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या दिव्यांग किंवा महिलांच्या डब्ब्यात रात्री १०ः३० नंतर तुरळक प्रवासी प्रवास करीत असतात. दिवसाच्या प्रवासात नागरिकांची वर्दळ असते. मात्र, रात्रीच्या प्रवासात या डब्ब्यात गर्दुल्ले प्रवास करताना आढळतात. तर महिलांच्या डब्ब्यात बारबाला प्रवास करतात. बोटावर मोजण्याइतके प्रवासी असल्याने रात्रीचा प्रवास धोक्याचा ठरतो. म्हणून रात्रीच्या प्रवासात बहुधा महिला वर्ग हा पुरुष वर्गाच्या डब्यातून प्रवास करणे पसंद करतो. रेल्वे महिला पोलिस डब्यात असल्यानंतर महिला बिनधास्त प्रवास करताना दिसतात. त्यामुळे आता दिव्यांगांच्या डब्यातील घटनेने दिव्यांगांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. याकडे रेल्वे प्रशासन आणि पोलिसांनी लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी नागरिक करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT