Corona Updates : मुंबईत कोरोना वाढतोय! 'या' रुग्णालयांमध्ये कोरोना वॉर्ड सुरु, बेडही वाढवले

corona update mumbai
corona update mumbaiesakal

Coronavirus in Mumbai : दिल्ली आणि मुंबईसह देशाच्या अनेक भागांमध्ये कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढतांना दिसून येत आहे. केरळ, कर्नाटक, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये कोरोना गतीने वाढत असल्याचं दिसून येतंय.

मुंबईमध्ये कोरोना संक्रमणाच्या आकड्यांत झपाड्याने वाढ होतेय. त्यामुळेच मुंबईतल्या अनेक दवाखान्यांमध्ये कोरोना वॉर्ड पुन्हा सुरु करण्यात आलेले आहेत.

हेही वाचाः नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

कोरोना वॉर्डांमध्ये व्हेंटिलेटर सपोर्टसह इतर सुविधा सज्ज करण्यात आलेल्या आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात कोरोना गतीने वाढत आहे. राज्यामध्ये अॅक्टिव्ह रुग्णसंख्या दोन हजार असून आकड्यांनुसार ऑक्टोबरनंतर पहिल्यांदा सक्रीय रुग्णसंख्या दोन हजारांपेक्षा जास्त झाली आहे.

corona update mumbai
Darshan Solanki Case : दर्शन सोलंकी आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांना सापडली नोट...

मुंबईमध्ये मागच्या २४ तासांत १२३ नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आलीय. विशेष म्हणजे रुग्णालयामध्ये दाखल होत असलेल्या बाधितांची संख्या वाढत आहे. मुंबईतल्या रुग्णालयांमध्ये सध्या ४३ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातले २१ जण ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. मुंबईमध्ये कोरोनाचे सक्रीय रुग्ण ५००च्या घरात आहेत. तब्बल चार महिन्यांनंतर एवढ्या केसेस समोर आल्या आहेत.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये बीएमसीने बेडच्या संख्येमध्ये वाढ केली आहे. बीएमसीच्या सेवन हिल्स हॉस्पिटलमध्ये १ हजार ८५० बेड वाढवण्यात आलेले आहेत. तर कस्तुरबा रुग्णालयात ३० बेड वाढवण्यात आले आहेत. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासनाने बेड वाढवण्यचा निर्णय घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com