नेरूळमध्ये दिवसाढवळ्या घडला 'हा' प्रकार; पोलिसात तक्रार दाखल 
मुंबई

नेरूळमध्ये दिवसाढवळ्या घडला 'हा' प्रकार; तक्रार दाखल

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : नेरूळ येथील सेक्‍टर- 58 ए ते सेक्‍टर- 60 दरम्यानच्या धारण तलावाच्या बांधावर (नियोजित गोल्फ मैदानाजवळील) असलेल्या खारफुटीचा पट्टा मंगळवारी (ता. 31) सकाळी नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून, वनाधिकाऱ्यांनी देखील त्या ठिकाणची पाहणी करून पंचनामा केला. 

नेरूळ येथील एनआरआय इस्टेट परिसरातील पाणथळ जमिनीवर गोल्फ मैदान आणि बहुमजली निवासी संकुल उभारण्याचा घाट सिडकोने घातला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी त्यास मज्जाव केला होता. जुलै महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली होती. याबाबतची सुनावणी अद्याप सर्वोच्च न्यायालयात झालेली नाही. मात्र, खारफुटी नष्ट करण्याचा झालेला हा प्रयत्न गोल्फ मैदानाची वाट मोकळी करण्यासाठी तर झालेला नाही ना? अशी शंका पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केली आहे. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण जोपर्यंत निकाली निघत नाही, तोपर्यंत येथे कोणत्याही प्रकारचे विकासकाम करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

याबाबत तक्रारकर्ते सेव्ह नवी मुंबई एन्न्हॉयर्नमेंटचे प्रमुख सुनील अगरवाल यांनी सांगितले की, सकाळी साडेआठच्या सुमारास पत्नीसह खाडीकिनाऱ्यालगत फिरत असताना सेक्‍टर 58 ए येथील व्यंकटेश टॉवरसमोर असलेल्या खाडीत 2 व्यक्ती खारफुटीची झाडे तोडत होत्या; तर एक व्यक्ती खाडीकिनारी उभी होती. त्याच्याजवळ झाडे कोणी तोडण्यास सांगितले वगैरे चौकशी केली असता त्याने आपल्या सहकाऱ्यांना बोलावून घेत तिथून काढता पाय घेतला. येथे पंचनाम्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सिडकोने तयार केलेल्या धारण तलावाच्या बांधावर खारफुटीच्या झुडपाचा पट्टा होता. तो नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याबाबत तेथे येणाऱ्या स्थानिक मच्छीमारांकडेही चौकशी केली; मात्र त्यांनीही आपणास काही माहीत नसल्याचे सांगितले. 

प्रकरण न्यायप्रविष्ट 
खारफुटीची तोड झालेल्या परिसरात गोल्फ मैदान होणार होते. हे प्रकरण अजून न्यायप्रविष्ट आहे. 2016 मध्येही अशाच प्रकारे येथील खारफुटी नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. न्यायालयासमोर येथे खारफुटीचे अस्तित्व नाही, असे सिद्ध करण्यासाठी हा खटाटोप असावा, असा अंदाज अगरवाल यांनी व्यक्त केला. 

खारफुटी असलेले क्षेत्र सिडको प्रशासनाच्या अखत्यारीत आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ज्याची जागा असेल, त्याने तेथील खारफुटीचे रक्षण, संवर्धन करणे गरजेचे आहे. आमच्या समूहाने त्या ठिकाणची पाहणी केली असून, त्याबाबतचा अहवाल सिडको प्रशासनाला पाठवत कारवाई करण्यास सांगण्यात येईल. 
- दादासाहेब कुकडे, क्षेत्रीय वन अधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

थलपतीला विजय मिळाला पण सत्ता नाही! मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी कुणाशी हातमिळवणी करणार? राज्यात त्रिशंकू स्थिती

Assembly election results 2026 Update : आसामसह बंगालमध्ये कमळ फुललं, तामिळनाडुत थलपतीचा विजय तर केरळमध्ये पुन्हा काँग्रेस

Mamata Banarjee : ममता बॅनर्जींचा पराभव, सत्ता अन् आमदारकीही गेली; भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांचा मोठा विजय

Mumbai News: धारावीतील गोंधळ संपणार? अनिर्णित म्हणजे अपात्र नाही, प्राधिकरणाचा स्पष्ट संदेश

Line Fire: सय्यदपुरात महावितरणची मुख्य तार तुटून रस्त्यावर भीषण आग

SCROLL FOR NEXT