Yacht Belvedere Catches Fire
Yacht Belvedere Catches Fire eSakal
मुंबई

Yacht Fire Video : मांडवा येथील समुद्रात केबिन क्रूजर याचला आग; व्हिडिओ समोर

Sudesh

Yacht Belvedere Catches Fire : मांडवा येथील समुद्रात असणाऱ्या मरीन सोल्यूशन्स केबिन क्रूजर याचला आग लागल्याची घटना घडली आहे. Belvedere असं या याचचं नाव आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. फ्री-प्रेस जर्नलने याचा व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये दिसतंय की समुद्रात उभ्या असलेल्या बेल्वेडिअरला आग लागलेली आहे. यातून धुराचे लोट बाहेर यत आहेत. या याचवर असणारे याचमास्टर दिलशाद मारणे हे या दुर्घटनेत गंभीर जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.

Sea Ray ब्रँडची ही लक्झरी पर्सनल मोटार याच बेल्वेडिअर नावाने रजिस्टर आहे. मरीन सोल्यूशन्स कंपनीकडून अशा याच ऑपरेट केल्या जातात. या कंपनीचे मालक गौतम दत्ता आणि त्यांचे वडील निवृत्त लेफ्टनंट जनरल एस. दत्ता आहेत.

यापूर्वी देखील मरीन सोल्यूशन्सकडून चालवल्या जाणाऱ्या एका 45 फूट सेल याचला आग लागल्याची घटना घडली होती. गेटवे ऑफ इंडियाजवळ ही घटना घडली होती. मात्र यावेळी याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. यानंतर आता पुन्हा एकदा आगीची घटना घडल्यामुळे मरीन सोल्यूशन्सवर काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: महाडमध्ये चवदार तळ्यावर आव्हाडांकडून मनुस्मृतीचं दहन; अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याला केला विरोध

Sushma Andhare: डॉ. अजय तावरेच्या जीवाला धोका; सहाव्या मजल्याचा उल्लेख करत सुषमा अंधारे काय म्हणाल्या?

Sharjeel Imam Bail: देशद्रोह प्रकरणात जामीन मिळूनही का होणार नाही शरजील इमामची सुटका; वाचा काय आहे प्रकार

Lok Sabha Election Predictions: अजित पवारांना एकही जागा मिळणार नाही, जाणून घ्या बिग बॉस फेम अनिल थत्ते यांचं महाराष्ट्राचं भाकीत...

Loksabha Result: सी-व्होटरचा सर्वात मोठा अंदाज, 4 जूनपूर्वीच लावला निकाल; भाजपच्या जागा होणार कमी

SCROLL FOR NEXT